Manipur मध्ये २ दहशतवाद्यांना अटक; मोठा शस्त्रसाठाही जप्त

80
Manipur मध्ये २ दहशतवाद्यांना अटक; मोठा शस्त्रसाठाही जप्त
Manipur मध्ये २ दहशतवाद्यांना अटक; मोठा शस्त्रसाठाही जप्त

मणिपूरच्या इंम्फाल पश्चिम जिल्ह्यात प्रतिबंधीत पीआरईपीएके संघटनेच्या २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. लीशांगथेम नेपोलियन मेतेई (Leeshangthem Napoleon Meitei) (३५) आणि थोकचोम अमुजाओ सिंग (Thokchom Amujao Singh) (३३) अशी त्यांची नावे आहे. त्यांना रविवारी सांगायप्रू मामंग लीकाई येथून पकडण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (Manipur)

सुरक्षा दलांनी चुराचंदपूर आणि तेंगनौपाल (Tengnaupal) जिल्ह्यांमध्ये शोध मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला,आहे. चुराचंदपूर जिल्ह्यातील मुअल्लम गावातून शनिवारी एक इन्सास रायफल (Insas rifle) , एक ९ एमएम पिस्तूल आणि एक सिंगल बॅरल रायफल जप्त करण्यात आली. दि. २७ डिसेंबर रोजी तेंगनौपाल जिल्ह्यातील सैवोम गावातून एक ३०३ रायफल, एक १२ बोअर सिंगल बॅरल गन, सात सुधारित स्फोटक उपकरणे, पाच हातबॉम्ब आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले. यापूर्वी, मणिपूरमधील सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान स्नायपर रायफल, पिस्तूल, ग्रेनेड आणि इतर शस्त्रांसह स्टारलिंक लोगो असलेले उपकरण जप्त केले. गेल्या दि. १३ डिसेंबर रोजी इम्फाळ पूर्व येथून ही वसुली करण्यात आली. भारतीय लष्कर आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत इंफाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी २१.५ किलो वजनाचे ५ आयईडी जप्त केले. (Manipur)

हेही वाचा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.