Manipur मध्ये जिरिबाम हल्ल्यानंतर CAPF च्या 20 तुकड्या तैनात; इम्फाळ खोऱ्यातील 5 जिल्हे बंद

68
Manipur मध्ये जिरिबाम हल्ल्यानंतर CAPF च्या 20 तुकड्या तैनात; इम्फाळ खोऱ्यातील 5 जिल्हे बंद
Manipur मध्ये जिरिबाम हल्ल्यानंतर CAPF च्या 20 तुकड्या तैनात; इम्फाळ खोऱ्यातील 5 जिल्हे बंद

मणिपूरमधील (Manipur) जिरीबाम जिल्ह्यातील जाकुराडोर कारॉन्ग (Jaguarador Carong) येथे 11 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी 10 कुकी अतिरेकी मारले होते. या घटनेपासून तीन महिला आणि तीन मुले बेपत्ता आहेत. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी दोन जणांचे जळालेले मृतदेहही सापडले. याच्या निषेधार्थ 13 नागरी हक्क संघटनांनी इंम्फाळ खोऱ्यात पूर्ण बंद पुकारला आहे. जिरीबामच्या घटनेनंतर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये (Manipur) सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांसह 20 अतिरिक्त CAPF तुकड्या तैनात करण्याचे आदेश जारी केले.

(हेही वाचा-Jammu-Kashmir मध्ये ११९ दहशतवादी सक्रिय)

आता मणिपूरमध्ये (Manipur) सुरक्षा दलाच्या 218 तुकड्या तैनात आहेत. ज्या नागरी हक्क संघटनांनी इंम्फाळ खोऱ्यात संप पुकारला त्यात इंटरनॅशनल पीस अँड सोशल ॲडव्हान्समेंट (IPSA), ऑल क्लब ऑर्गनायझेशन असोसिएशन, मीरा पैबी लूप (ACOAM LOOP), इंडिजिनियस पीपल्स असोसिएशन ऑफ कांगलीपाक ​​(IPAK) आणि कांगलीपाक स्टूडेंट्स असोसिएशन (KSA) यांचा समावेश आहे.

(हेही वाचा-विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धडा शिकवा; J. P. Nadda यांचे आवाहन)

बंदमुळे प्रभावित झालेल्या खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये इम्फाळ पूर्व, इंम्फाळ पश्चिम, थौबल, ककचिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील सर्व शाळा, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे. बंददरम्यान इम्फाळ खोऱ्यात शांतता होती पण जिरीबामजवळील नागाबहुल तामेंगलाँग जिल्ह्यात दोन ट्रक पेटवण्यात आले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जुनी कैफुंडई येथे ही घटना घडली. सशस्त्र अतिरेक्यांनी माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला लक्ष्य केले होते. (Manipur)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.