Chhattisgarh मध्ये २२ माओवाद्यांचा खात्मा; चकमकीत एक जवान हुतात्मा

32
Chhattisgarh मध्ये २२ माओवाद्यांचा खात्मा; चकमकीत एक जवान हुतात्मा
Chhattisgarh मध्ये २२ माओवाद्यांचा खात्मा; चकमकीत एक जवान हुतात्मा

Chhattisgarh मध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दल (security forces) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalite Attack) झालेल्या भीषण चकमकीत एकूण २२ नक्षलवादी ठार झाले. बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील (Bijapur-Dantewara border) गंगलूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याचे बिजापूर पोलिसांनी सांगितले. तर कांकेरमध्ये (Kanker Naxalism killed) चार नक्षलवादी मारले गेले. मात्र, यामध्ये एक सैनिकही हुतात्मा झाला आहे. अशी माहिती बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिली. (Chhattisgarh)

मिळलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान (Indravati National Park) परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. यादरम्यान पहाटे चकमक सुरू झाली. यावेळी सुरक्षा दलांनी एके ४७, एसएलआर, INSAS रायफल्स आणि स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.

(हेही वाचा – Disha Salian मृत्यू प्रकरणाचे पडसाद विधानसभेत; Aaditya Thackeray यांच्या अटकेची जोरदार मागणी)

९ फेब्रुवारी रोजीच्या कारवाईत ३१ नक्षली ठार
याआधी ९ फेब्रुवारी रोजी विजापूर जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते. या दरम्यान दोन सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाले होते. तसेच गेल्या आठवड्यात छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात तब्बल १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांनी फेब्रुवारीमध्ये विजापूर जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १८ नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून स्फोटकेही जप्त करण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.