मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) आता भारतात आणलं जात आहे. तहव्वुर राणा आज बुधवारी (९ एप्रिल) भारतात येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, जी अमेरिकन न्यायालयाच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राणाला (Tahawwur Rana) सुरुवातीचे काही आठवडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येईल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी त्यांच्यावर देखरेख ठेवतील.
भारतातील तपास यंत्रणांचे पथक अमेरिकेत पोहोचले आहे. ही टीम अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात व्यस्त आहे. आता प्रश्न असा आहे की, तेहव्वूर राणा भारतात आला तर त्याला कुठे ठेवले जाईल? यासाठी दोन पर्याय आहेत. पहिले दिल्लीतील तिहार तुरुंग आणि दुसरे मुंबईतील आर्थर रोड तुरुंग. या दोन्ही ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. अंतिम निर्णय अद्याप समोर आलेला नाही. (Tahawwur Rana)
हेही वाचा- Donald Trump : ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा ! अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर
अजित डोवाल स्वतः तहव्वुर राणाच्या संपूर्ण प्रत्यार्पणावर लक्ष ठेवून आहेत. तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात कसे आणले जाईल, कोणत्या औपचारिकता आहेत आणि त्याला भारतातील कोणत्या तुरुंगात ठेवले जाईल, भारतात आणल्यानंतर त्याचे काय होईल, या सर्व गोष्टींवर अजित डोभाल बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तहव्वुर राणा भारतात आल्यानंतर आणि न्यायालयात हजर झाल्यानंतर, एनआयए त्याची कोठडीत चौकशी करण्याची मागणी करू शकते. (Tahawwur Rana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community