Jammu and Kashmir च्या किश्तवाडमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमकीत लष्कराचे JCO हुतात्मा

74
Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाडमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर, लष्कराने जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. तसेच नियंत्रण रेषेवरवर (LOC) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) हुतात्मा झाला आहे. मात्र या चकमकीत शूर सैनिकांनी दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडू दिली नाही. तसेच शुक्रवारी रात्री उशिरा अखनूरच्या केरी बट्टल (Akhnoor Battal) भागात ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा – मुंबईतील टँकर संपावर तातडीने तोडगा काढा; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश)

दरम्यान, शुक्रवारी किश्तवाड जिल्ह्यातील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी रात्री उशिरापर्यंत ३ दहशतवाद्यांना ठार मारले. रात्रभर ऑपरेशन चालू होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मारले गेलेले तिन्ही दहशतवादी (Terrorism in Jammu and Kashmir)  जैश-ए-मोहम्मदचे होते. त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश आहे. 
(हेही वाचा – IPL 2025 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्जचा बोचरा पराभव, या नकोशा गोष्टींतही संघ पहिला)
यापूर्वी, ४ आणि ५ एप्रिलच्या मध्यरात्री, बीएसएफ जवानांनी जम्मूमधील नियंत्रण रेषेवरील आरएस पुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले होते. तर १ एप्रिल रोजी नियंत्रण रेषेवर झालेल्या लष्कराच्या चकमकीत ४-५ पाकिस्तानी घुसखोर मारले गेले. ही घटना पूंछमधील नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरच्या पुढच्या भागात घडली.

भारतीय लष्कराने (Indian Army) अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, खराब हवामान असूनही, किश्तवारमधील कारवाईत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये एके आणि एम४ रायफलसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.