सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यात आली असून दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटर पथकाने ३ नक्षलवाद्यांना ठार (Naxalites Killed) केले आहे. या कारवाईत नक्षल नेते सुधीर उर्फ मुरलीचा खात्मा झाल्याची माहिती आहे. नक्षलवादी मुरलीवर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते, त्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड (Chhattisgarh) राज्याच्या दंतेवाडा (Dantewada), बिजापूर (Bijapur) क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर करण्यात आलेल्या करवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले.
(हेही वाचा – कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक Qari Shahzad ची गोळ्या झाडून हत्या)
दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटरच्या टीमने अभियानावर असताना सकाळी 8 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांवर कारवाईला सुरुवात केली. त्या वेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या (Security Forces) जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत २५ लाख इनामी नक्षलनेता सुधीर उर्फ मुरली याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. तर, अन्य दोन नक्षलवाद्याची ओळख पटवली जात आहे.
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. आताही घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. चकमकी दरम्यान INSAS रायफल (INSAS Rifle), 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बस्तर क्षेत्रात 2025 मध्ये विविध चकमकीत 100 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. विजापूरमध्ये २० आणि कांकेरमध्ये १० नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा रक्षकांकडून स्वयंचलित शस्त्रांसह या नक्षलवाद्यांचे सर्व मृतदेह जप्त करण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community