आयएनएस त्रिकंडमधून ४० टन ऑक्सिजन महाराष्ट्रात! फ्रान्सकडून भारताला मदत! 

केंद्र सरकारने फ्रान्समधून आलेला हा ४० टन लिक्विड ऑक्सिजन थेट महाराष्ट्रासाठी पाठवला आहे. आता हे दोन्ही टँकर्स पुणे येथे रवाना होणार आहेत.

सध्या भारतात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे, आरोग्य सुविधा अपुरी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात मृत्यू दर वाढलेला आहे. अशा  स्थितीत भारताला मित्र राष्ट्रांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून फ्रान्सकडून भारताला ४० टन लिक्विड ऑक्सिजन गॅसचे दोन टँकर मदत म्हणून पाठवण्यात आले. १० मे रोजी सकाळी ९ वाजता हे टँकर आयएनएस त्रिकंडच्या माध्यमातून मुंबईत उतरवण्यात आले.

हा सर्व ४० टन लिक्विड ऑक्सिजन असून २७-२७ टनांच्या दोन टँकरमधून तो भारतात पाठवण्यात आला. नौदलाच्या आयएनएस त्रिकंड या युद्धनौकेच्या माध्यमातून हा ऑक्सिजन भारतात आणण्यात आला आहे. फ्रेंच देशांबरोबर नौदलाचा युद्धसराव सुरू आहे. अशा वेळी सध्याच्या आरोग्यासंबंधी आणीबाणीच्या परिस्थितीत विविध युद्धनौकांना कोरोनाशी संबंधित मदत घेण्यासाठी आखाती देशांमध्ये वळवण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक आयएनएस त्रिकंड ही युद्धनौका फ्रांस येथे रवाना झाली होती.

(हेही वाचा : वायू दलाची मदत भरारी ! कोविडसंबंधी साहित्यांचे वितरण!)

पुण्याला नेणार टँकर्स! 

केंद्र सरकारने फ्रान्समधून आलेला हा ४० टन लिक्विड ऑक्सिजन थेट महाराष्ट्रासाठी पाठवला आहे. आता हे दोन्ही टँकर्स पुणे येथे रवाना होणार आहेत. तेथून ते महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागात वितरित केले जाणार आहेत, जेथे ऑक्सिजनचा तुटवडा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here