जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर आतापर्यंत 439 दहशतवादी ठार झाले आहेत. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
439 terrorists eliminated in J-K after Article 370 abrogation: MoS Home Nityanand Rai
Read @ANI Story | https://t.co/SHdrSLbu9l#article370 #JammuAndKashmir #terrorists pic.twitter.com/SNRyARuYDk
— ANI Digital (@ani_digital) February 2, 2022
(हेही वाचा – मनपा निवडणुकीत राज ठाकरेंचा ‘वन मॅन शो’!)
दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये 98 नागरिकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या दहशवतादी घटना आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर 439 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये 98 नागरिकांचा मृत्यू झाला असून 109 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहेत.
दहशतवादी संघटनांची दिली माहिती
राज्यातून कलम 370 हटवल्यानंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 541 चकमकीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी दहशतवादी संघटना आणि भारतात दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांची माहिती राज्यसभेत देण्यात आली होती. भारताने देशात एकूण 42 संघटनांची दहशतवादी संघटनांच्या यादीत नोंद केली आहे. तसेच युएपीए अंतर्गत 31 जणांची नोंद दहशतवादी म्हणून करण्यात आल्याचं राय यांनी राज्यसभेत सांगितले.