कुनो राष्ट्रीय उद्यानातून (Kuno National Park) बाहेर आलेल्या पाच चित्त्यांवर ग्रामस्थांनी काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. तथापि, घटनास्थळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या बचाव पथकाने ग्रामस्थांना बिबट्यांपासून दूर राहण्यास सांगितले, परंतु त्यांनी ऐकले नाही. (Kuno National Park)
Cheetah’s in Kuno National Park are in Pathetic day to day situations! pic.twitter.com/sadM4QoRhM
— Forests And Wildlife Protection Society-FAWPS 🇮🇳 (@FawpsIndia) March 25, 2025
यात चित्त्यांना दुखापत झाली नसली तरी, वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनी ग्रामस्थांच्या कृतीवर टीका केली आहे. अभयारण्यात वास्तव्यात असलेल्या चित्त्यांपैकी ज्वाला ही मादी आणि तिचे चार बछडे सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवपूर जिल्ह्यातील एका गावाच्या हद्दीबाहेर चरत असलेल्या वासराची शिकार करू पाहात होते. ते पाहून आसपासच्या शेतांत काम करणारे शेतकरी व ग्रामस्थ गोळा झाले. त्यातील काहींनी चित्त्यांवर दगडांचा मारा सुरु केला. याची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांचे पथक तेथे धडकले. या गोंधळामुळे बिथरलेल्या चित्त्यांनी जंगलात पळ काढला. सर्व चित्ते सुखरूप असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. (Kuno National Park)
श्योपुर – कूनो नेशनल पार्क के जंगल से निकलकर रहवासी इलाके में पहुंचा चीतों का परिवार, देखने लगी लोगों की भीड़, ग्रामीणों ने पत्थर मारे #Sheopur #KunoNationalPark @KunoNationalPrk #ForestDepartment @minforestmp #Cheetah #MPNews #PeoplesUpdate pic.twitter.com/B63ZJcxN0j
— Peoples Update (@PeoplesUpdate) March 24, 2025
सोमवारी येथील तेलीपुरा गावाजवळील शेतांमध्येही चित्ते आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी ग्रामस्थांनी चित्त्यांच्या वाटेत अडसर आणू नये, असे आवाहन प्रकल्पाचे संचालक उत्तमकुमार शर्मा यांनी केले आहे. चित्त्यांनी एखाद्या गुराची शिकार केल्यास त्यांच्या मालकास योग्य भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.(Kuno National Park)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community