केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ या दिवशी देशातून नक्षलवाद कायमचा संपवलेला असेल, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार नक्षलवादी चळवळीतून (Naxalite Movement) मोठ्या संख्येने नक्षलवादी बाहेर पडून ते आत्मसमर्पण करू लागले आहेत. छत्तीसगड येथून ५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची नक्षलवादी चळवळ संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या 50 नक्षलवाद्यांच्या (Naxalite Movement) आत्मसमर्पणाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, या सर्वांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाईल, असे सांगितले. नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी हिंसा आणि शस्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो. जो नक्षलवादी (Naxalite Movement) शस्त्र सोडून विकासाचा मार्ग पत्करेल, त्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडले जाईल, असे पंतप्रधान मोदींचे धोरण स्पष्ट आहे. इतर नक्षलवाद्यांना (Naxalite Movement) हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचे आवाहन करत शाह पुढे म्हणाले, मी पुन्हा एकदा उर्वरित नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. 31 मार्च 2026 नंतर देशात नक्षलवाद इतिहास राहील, हा आमचा संकल्प आहे. असेही शाह म्हणाले. आत्मसमर्पण केलेल्या 50 नक्षलवाद्यांपैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community