अरुणाचल प्रदेशात सीमावर्ती भागातील चीनच्या भारताविरोधी कारवाया सुरुच आहेत. या भागात दुसरे इमारतींंचे एक क्लस्टरच चीनकडून उभारण्यात आल्याचे उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रातून उघड झाले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यांसदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. याच भागाची 2019 मध्ये उपग्रहाच्या माध्यामातून जी छायाचित्रे टिपण्यात आली होती. त्या छायाचित्रांमध्ये कोठेही या इमारतींचे अस्तित्व दिसून येत नाही. पण, त्यानंतर 2021 मध्ये त्या ठिकाणी इमारती स्पष्टपणे दिसत आहेत.
या इमारतींमध्ये नेमके कोणाचे वास्तव्य?
अरुणाचलमध्ये ज्या ठिकाणी चीनने गाव उभारल्याचा दावा केला जातो. तिथून पूर्वेला हे क्लस्टर 93 किलोमीटरवर आहे. मध्यंतरी एका वृत्तवाहिनीने चीनी घुसखोरीचा दावा केल्यानंतर अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालय पेंटागाॅननेही त्याला दुजोरा दिला होता. चीनने दुसरी वसाहत ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेत असलेल्या जागेमध्ये बांधली आहे. या भूभागावर भारताने आधीच दावा केला आहे. या सगळ्या इमारतींमध्ये नेमके कोणाचे वास्तव्य आहे? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
(हेही वाचा : वीर सावरकरांच्या चरणी आणल्या शिवशाहिरांच्या अस्थी )
लष्कराकडून अप्रत्यक्ष दुजोरा?
या इमारती चीनी हद्दीमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेपासून पूर्वेला असल्याचे लष्काराने म्हटले आहे, पण हे बांधकाम ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेदरम्यान असलेल्या भूभागावर उभारण्यात आलेले बांधकाम लष्कराने अमान्य केलेले नाही. भारताच्या या भागावर चीनने अवैधरीत्या कब्जा केला आहे. त्यावर भारताने सतत आक्षेप घेतला आहे.
Join Our WhatsApp Community