Israel Lebanon Hezbollah War : लेबनॉनमध्ये ७०० लोकांचा मृत्यू; भारतीयांसाठी नवी अधिसूचना जारी

इस्त्रायल- लेबनॉन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका- फ्रान्सचा पुढाकार

87
Israel Lebanon Hezbollah War : लेबनॉनमध्ये ७०० लोकांचा मृत्यू; भारतीयांसाठी नवी अधिसूचना जारी
Israel Lebanon Hezbollah War : लेबनॉनमध्ये ७०० लोकांचा मृत्यू; भारतीयांसाठी नवी अधिसूचना जारी

लेबनॉन आणि इस्त्रायलमध्ये (Israel Lebanon Hezbollah War) गेल्या ८ दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लेबनॉनमधील युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने तेथील भारतीयांसाठी एक नवी सूचना जारी केली आहे. बैरूतमधील भारतीय दूतावासाने येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच लोकांना सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

इस्त्रायलचे लष्करी प्रमुख हरजाई हलेवी (Harjai Halevi) यांनी दि. २५ सप्टेंबर रोजी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमध्ये त्यांच्या हवाई हल्ल्यांचा उद्देश हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि जमिनीवर घुसखोरीचा मार्ग शोधणे हा आहे. त्यामुळे इस्त्रायल सैन्याने दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री हिजबुल्लाच्या ७० ठिकाणांवर हल्ला केला. ज्या हल्ल्यात ७२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

(हेही वाचा : Swaminarayan Mandir : अमेरिकेत हिंदू मंदिराची विटंबना; ‘हिंदूनो परत जा’ म्हणत द्वेषपूर्ण घोषणाबाजी!)

दरम्यान इस्त्रायल- लेबनॉन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका- फ्रान्सने २१ दिवसांच्या युद्धबंदीची मागणी केली आहे. तसेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. मात्र हिजबुल्लाह, लेबनॉन आणि इस्त्रायलने युद्धविरामाच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बायडेन (Biden) यांनी दिली आहे. त्यामुळे इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात १८ वर्षातील सर्वात मोठे युद्ध असल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे लेबनॉनमध्ये इस्त्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.