Jammu & Kashmir Terrorist Attack मध्ये सीआरपीएफचा एक अधिकारी हुतात्मा

169
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले (Jammu & Kashmir Terrorist Attack) होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये गस्तीवर असलेल्या एका पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक अधिकारी हुतात्मा झाले आहेत. कुलदीप सिंग असे या हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या अधिकाऱ्याच नाव होते, अशी माहिती सांगितली जात आहे.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधील चील आणि दुडू भागात जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे विशेष पथक गस्तीवर होते. यावेळी दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. यानंतर पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष पथकाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, या चकमकीमध्ये सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याला गोळी लागली. यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असताना त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सध्याही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे.जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले की, सीआरपीएफचे जवान दुडू परिसरात गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर (Jammu & Kashmir Terrorist Attack) सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्याला वीरमरण आले, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.