जम्मू- काश्मिरमधील सांबा जिल्ह्यातील भारत- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत एक भुयार आढळले आहे. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन आत्मघाती हल्लेखोरांकडून भारतीय हद्दीत घुसण्यासाठी या सुरुंगाचा वापर करण्याात आला असावा, असा संशय असल्याचे अधिका-यांनी गुरुवारी सांगितले. अमरनाथ यात्राजवळ असताना, हे सुरुंग सापडल्याने व्यवस्था अधिक दक्ष झाली आहे.
अखेर भुयार सापडले
जम्मूतील संजवान भागात 22 एप्रिल रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी सुरक्षा पथकाने दोन आत्मघाती हल्लेखोरांना ठार केले होते. तेव्हापासून सीमा सुरक्षा दलाकडून भुयाराचा शोध घेण्यात येत होता. अखेर गुरुवारी संध्याकाळी सांबा जिल्ह्यात एक भुयार शोधण्यात यश मिळाले, अशी माहिती बीएसएफचे पोलीस महानिरिक्षक डी.के. बुरा यांनी दिली.
( हेही वाचा: रेपो दरवाढीचा परिणाम; या दोन बँकांची कर्जे महागली )
काश्मीरमध्ये आढळलेली भुयारे
- मागच्या 6 महिन्यांत 1 भुयार
- मागच्या वर्षी 2
- आणि दशकभरात 11 भुयारे सापडली आहेत.