Abu Qatal killed in Pakistan : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल पाकिस्तानात ठार !

Abu Qatal killed in Pakistan : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल पाकिस्तानात ठार !

60
Abu Qatal killed in Pakistan : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल पाकिस्तानात ठार !
Abu Qatal killed in Pakistan : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल पाकिस्तानात ठार !

लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी (Terrorism) संघटनेतील क्रूरकर्मा अबू कताल (Abu Qatal ) उर्फ कताल सिंघी हा शनिवारी (१५ मार्च) रात्री पाकिस्तानमध्ये एका हल्ल्यात ठार झाला आहे. कताल हा जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तसेच तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेमधील महत्त्वाचा ऑपरेटिव्ह होता. (Abu Qatal killed in Pakistan)

हेही वाचा-Weather Update : कोल्हापूरच्या शाहुवाडीत मुसळधार पाऊस ; हवामानात होणार मोठे बदल, वाचा सविस्तर

अबू कताल लष्करमध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम करत होता. तसेच त्याने जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायावर अनेक हल्ले घडवून आणले होते. भारतीय लष्कर, सुरक्षा यंत्रणा व गुप्तहेर यंत्रणा अबू कतालवर लक्ष ठेवून होती. अखेर शनिवारी रात्री अबू कताल ठार झाला. मात्र, त्याचे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. (Abu Qatal killed in Pakistan)

हेही वाचा-Mumbai Indians दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन ! दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

कताल हा २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा साथीदार होता. पाकिस्तानमधील झेलम येथे शनिवारी सायंकाळी अबू कतालवर गोळीबार झाला. त्यावेळी हाफिज सईद देखील त्याच्याबरोबर होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर हाफीज सईदने तिथून पळ काढला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. (Abu Qatal killed in Pakistan)

हेही वाचा-BMC : मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी: माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून परतणाऱ्या तीर्थयात्रेकरूंच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला (९ जून) हा अबू कतालनेच घडवून आणला होता. त्या हल्ल्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या दोषारोप पत्रातही अबू कताल याचं नाव नमूद करण्यात आलं होतं. १ जानेवारी २०२३ रोजी राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात हा दहशतवादी हल्ला झाला होता. (Abu Qatal killed in Pakistan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.