‘९/११’पासून आतापर्यंत जिहादी कारवायांत २०० टक्क्यांनी वाढ! भारताचा सुरक्षा अहवाल

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढू शकतात. ग्लोबल जिहाद भारतासमोर एक मोठे आव्हान बनू शकते, या सुरक्षा अहवालात म्हटले आहे.

75

जागतिक जिहाद जगभरात वाढत आहे, अफगाणिस्तानात अफगाणिस्तानातील नाटो आणि अमेरिकन सैन्य या जगातील सर्वात शक्तीशाली सैन्यांचा पराभव जिहादी शक्तींना बळ देणारा आहे. विशेष म्हणजे जगभरात जिहादी कारवाया ९/११ च्या हल्ल्याच्या तुलनेत ४०० पटीने वाढल्या आहेत, अशा धक्कादायक निष्कर्ष भारताच्या अंतर्गत सुरक्षा अहवालात म्हटले आहे.

भारताला धोका वाढला!

तालिबानच्या राजवटीत इतर देशांतील दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानमध्ये चांगले वातावरण मिळेल. अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढू शकतात. भारताच्या अंतर्गत सुरक्षा अहवालात हे उघड झाले आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढू शकतात. ग्लोबल जिहाद भारतासमोर एक मोठे आव्हान बनू शकते, या सुरक्षा अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा : वडेट्टीवारांची ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’! एमपीएससी परीक्षेवरून पडळकरांचा हल्लाबोल)

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटना स्थापन

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान एक मोठी दहशतवादी संघटना स्थापन करण्यात आली आहे. पाकिस्तानचे सर्व जिहादी गट त्यात सामील होत आहेत. अगदी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संस्थेचाही समावेश आहे. अशा स्थितीत जिहादी कारवाया केवळ जम्मू -काश्मीरमध्येच नव्हे तर दक्षिण आशियातील इतर भागातही वाढू शकतात. यामध्ये बांगलादेश, मालदीव, श्रीलंका सारख्या देशांचा समावेश आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात हलवण्याचा प्रयत्न करेल. तसेच अमली पदार्थांची तसेच दहशतवाद देखील या प्रदेशात वेगाने पसरेल.

अफगाणिस्तान जगातील पातळीवरील जिहाद्यांचा गड बनेल!

९/११च्या हल्ल्यानंतर २० वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेवर हल्ला केला. आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दहशतवादी गटांकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. तसेच पाकिस्तानच्या पाठिंब्याने अफगाणिस्तान संपूर्ण जगाच्या जिहादी शक्तींचा गड बनू शकतो. जगाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे राहणार नाही, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.