CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना विशेष प्राधान्य मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ योजने’च्या अनुषंगाने , केंद्रीय गृह मंत्रालयाने सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भर्तीसाठी या योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण केलेल्या ‘अग्निवीरांना’ प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबात ट्वीटर द्वारे माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने घोषित केले की, अग्निपथ योजना हा तरुणांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शी आणि स्वागतार्ह निर्णय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे, ‘अग्निपथ योजने’ अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले युवक राष्ट्रसेवा आणि सुरक्षेत योगदान देऊ शकतील. या निर्णयाच्या आधारे विस्तृत योजना तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. गृह मंत्रालयाने सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भर्तीसाठी या योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण केलेल्या ‘अग्निवीरांना’ प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – #AgnipathScheme: केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ भरती योजने’ला तरूणांकडून का होतोय विरोध?)

काय आहे अग्निपथ योजना

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी ‘अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली असून यादरम्यान तरुणांना अल्प कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.  या योजनेमुळे देशातील तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अभ्यास केल्यानंतर ही योजना आणली जात आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल आणि चांगला पगारही मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here