वायुदलाच्या प्रमुखपदीही  महाराष्ट्राचे सुपुत्र! 

एअर मार्शल विवेक चौधरी यांचे आजोबा हे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावात काही काळ वास्तव्यास होते.

वायुदलाच्या प्रमुखपदावरून एअर मार्शल आर.के.एस. भदोरिया हे सेवा निवृत्त झाले. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे सुपुत्र विवेक चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. एका बाजूला सेना प्रमुख मनोज नरवणे हेही महाराष्ट्रातील आहेत. आता वायुदलातील प्रमुख पदावर नांदेडचे एअर मार्शल विवेक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल विवेक राम चौधरी यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

विवेक चौधरी यांचे आजोबा हे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावात काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे हस्तरा या गावातील नागरिकांनी चौधरींच्या यांच्या या नियुक्तीबद्दल आंनद व्यक्त केलाय. चौधरी यांच्या या मराठमोळ्या कनेक्शनमुळे संबंध नांदेड जिल्ह्यातून देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

(हेही वाचा : कुलाबा-सीप्झ मेट्रोची आरेतील ‘त्या’ जागेवर एन्ट्री होणार नाहीच!)

कोण आहे विवेक चौधरी? 

हवाई दलाचे उपप्रमुख बनण्यापूर्वी एअर मार्शल चौधरी यांनी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे कमांडर-इन-चीफ म्हणून काम केले आहे. या कमांडवर संवेदनशील लडाख प्रदेश तसेच उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. एअर मार्शल चौधरी यांचा २९ डिसेंबर १९८२ रोजी हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला. ३ वर्षांच्या विशिष्ट कारकीर्दीत या अधिकाऱ्याने भारतीय हवाई दलाची विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमाने उडवली आहेत. त्यांच्याकडे मिग – २१, मिग – २३ एमएफ, मिग – २९ आणि सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल फ्लाइंगसह ३,८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here