राजस्थानात हवाई दलाचे विमान कोसळले 

भारतीय हवाई दलाचे मिग लढाऊ विमान गुरुवारी संध्याकाळी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात कोसळले. रात्री नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यात दोन पायलट हुतात्मा झाले.

बाडमेर जिल्ह्यातील भीमडा गावात अर्धा किलोमीटर अंतरावर विमानाचे अवशेष विखुरलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसराचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात दोन पायलट होते, यात या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा मिग विमान बायतू प्रदेशात फिरत होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here