Air Force Recruitment: ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत हवाई दलाची भरती प्रक्रिया ‘या’ दिवसापासून होणार सुरू

सैन्य दलातील ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आलीय. आगामी 24 जून पासून अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती एअर चिफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी शुक्रवारी दिली.

पहिल्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा किती?

यासंदर्भात एअर चिफ मार्शल म्हणाले की, भारत सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत सशस्त्र दलात तरुणांची भरती केली जाऊ शकते. या योजनेत भरतीचे वय 17.5 वर्षे ते 21 वर्षे ठेवण्यात आले आहे. पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने तरुण या भरतीसाठी अर्ज करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – विधान परिषदेसाठी मलिक, देशमुखांना मतदान करता येणार नाही)

‘अग्निवीर’ म्हणून सैन्यात भर्ती होण्याची संधी

यासोबतच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्याच्या निर्णयामुळे सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना संधी मिळणार आहे. पण कोरोना साथरोगामुळे गेले 2 वर्षे भरती योजना थांबवण्यात आली होती. लष्करात भरतीसाठी वयात सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर लवकरच भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल, असे जनरल पांडे यांनी सांगितले. लष्करप्रमुखांनी इच्छुक तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यात भर्ती होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ‘भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here