Air India च्या विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. न्यूयॉर्कला जाणारे Air India चे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात ३२० हून अधिक प्रवासी होते.
सोमवार, १० मार्चला मुंबई-न्यूयॉर्क विमान प्रवासादरम्यान एआय११९ विमानात संभाव्य सुरक्षेचा धोका आढळून आला. यानंतर Air India विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉल नुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले. विमानाच्या शौचालयात विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली. या विमानात १९ क्रू मेंबर्ससह ३२२ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान मुंबई येथे सकाळी १०.२५ वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
Join Our WhatsApp Community