एयर मार्शल व्ही आर चौधरी यांची भारतीय वायू सेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. चौधरी सध्या वाइस चीफ ऑफ एयर स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. वर्तमान वायू सेना प्रमुख एयर मार्शल आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर चौधरी हा पदभार स्वीकारणआर आहेत.
कोण आहेत व्ही आर चौधरी?
29 डिसेंबर 1982 रोजी एयर मार्शल व्ही आर चौधरी यांची भारतीय वायू सेनेच्या फायटर स्ट्रीम मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. वाइस चीफ ऑफ एयर स्टाफसह अनेक पदे त्यांनी भारतीय वायू सेनेत भूषवली आहेत. वायू सेनेचे उपाध्यक्ष असणा-या चौधरी यांनी राफोल करारात सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राफेल परियोजनेच्या द्विपक्षीय उच्चस्तरीय समितीचे प्रमुख होते.
(हेही वाचाः अफगाणिस्तानातून भारतात आले तीन टन ‘हेरॉईन’! कसे? वाचा)
39 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
व्ही आर चौधरी 1 ऑगस्ट 2020 पासून देशाच्या पश्चिम वायू कमानीचे प्रमुख आहेत. 1982 पासून जवळपास त्यांनी 39 वर्ष भारतीय वायू सेनेत सेवा दिली आहे. व्ही आर चौधरी यांनी एकूण 3 हजार 800 तास हवाई उड्डाण केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक लढाऊ आणि शिकाऊ विमानांची यशस्वी प्रात्यक्षिके केली आहेत.
संरक्षण मंत्रालयाची माहिती
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी वायू सेनेचे प्रमुख म्हणून व्ही आर चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp CommunityAir Marshal V R Chaudhari appointed next Chief of the Air Staff. Press release: https://t.co/21PyMJp5IX @IAF_MCC @airnews_mumbai @airnews_pune pic.twitter.com/XbNW6aAhYB
— PRO Defence Pune (@PRODefPune) September 21, 2021