भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअर स्ट्राइकच्या (Airstrike) माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअर स्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून म्यानमारचं लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये भारताच्या सीमेलगत भीषण गोळीबार सुरू आहे.
या घटनेनंतर म्यानमारमधील शेकडो नागरिक सुरक्षित आसरा शोधण्यासाठी भारताच्या सीमेवर गोळा झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील सैन्य आणि चीनलँड डिफेन्स फोर्स (CDF)च्या कॅडर्समध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. म्यानमारच्या लष्कराचा सामना करण्यासाठी २०२१ मध्ये संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
(हेही वाचा – Diwali Firecrackers : मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांवर कारवाई, ७८४ गुन्हे दाखल )
म्यानमारकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात नेमके किती बंडखोर मारले गेले, याची माहिती मिळू शकलेली नाही. भारत आणि म्यानमार या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ या बंडखोरांनी आपले अड्डे उभे केले आहेत. त्या अड्ड्यांनाच म्यानमारकडून लक्ष्य करण्यात आले आहे. चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळपासून गोळीबारपासून सुरू आहे. तो रात्रभर सुरू होता. आज सकाळी हा गोळीबार थांबला. संरक्षणविषयक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या दोन आठवड्यांमध्ये उत्तरी शान राज्यामध्ये लढा तीव्र झाला आहे.
म्यानमारमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंसेनंतर म्यानमारच्या १ हजारांहून अधिक नागरिकांनी भारताच्या सीमेमध्ये आश्रय घेतला आहे. चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारपासून म्यानमारचे नागरिक भारताच्या हद्दीत आले आहेत. याचा निश्चित आकडा सांगू शकत नाही. हे चक्र गेल्या २ वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. बहुंताश परत जातील तेव्हा परिस्थिती सामान्य होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community