Airstrike in Myanmar : म्यानमार लष्कराचा आपल्याच गावातील नागरिकांवर हवाई हल्ला ; ६ मुलांसह २७ जण ठार

40
Airstrike in Myanmar : म्यानमार लष्कराचा आपल्याच गावातील नागरिकांवर हवाई हल्ला ; ६ मुलांसह २७ जण ठार
Airstrike in Myanmar : म्यानमार लष्कराचा आपल्याच गावातील नागरिकांवर हवाई हल्ला ; ६ मुलांसह २७ जण ठार

म्यानमारच्या लष्कराने (Myanmar Army) सशस्त्र बंडखोरांच्या (लोकशाही समर्थक) ताब्यात असलेल्या गावावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. म्यानमारमधील ऑनलाइन माध्यमांनी याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मंडाले पीपल्स डिफेन्स फोर्सच्या (Mandalay People’s Defence Force) प्रवक्त्याने सांगितलं की मंडाले शहराच्या उत्तरेस ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगू शहरातील लेट पान या गावावर हा हल्ला करण्यात आला. मंडाले हे म्यानमारमधील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. (Airstrike in Myanmar)

(हेही वाचा – Vidhan Parishad Election 2025 : माधव भंडारी यांच्यावर पुन्हा अन्याय? विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर)

म्यानमार २०२१ पासून पुन्हा लष्करशाहीच्या ताब्यात गेला आहे. तेव्हापासून तिथे अस्थैर्य आहे. लोकशाही समर्थक लोकांचे गट लष्करशाहीशी प्राणपणाने लढत आहेत. या गटांनी अनेक गावे आपल्या निंयत्रणात आणली असून अशाच एका गटाच्या निंयत्रणात असलेल्या गावावर म्यानमारच्या लष्कराने (Myanmar Army) शुक्रवारी सायंकाळी (१४ मार्च) हल्ला केला. (Airstrike in Myanmar)

ज्या गावावर हा हल्ला झाला ते गाव जुंटाविरोधी गट एमडीवाय-पीडीएफच्या (Mandalay People’s Defence Force) निंयत्रणात आहे. या हल्ल्यानंतर एमडीवाय-पीडीएफने म्हटलं आहे की जुंटा सैन्न्याने गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सहा लहान मुलांसह २७ लोकांचा बळी गेला आहे. एमडीवाय-पीडीएफने त्यांच्या टेलिग्राम (Telegram) चॅनेलवर पोस्ट करून या हल्ल्याची माहिती दिली आहे. (Airstrike in Myanmar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.