कारगिल युद्ध संपले, तरी नियंत्रण रेषेवर लढाई सुरुच होती; Indian Army ला का करावे लागले ‘ऑपरेशन राहुल’?

२७ आणि २८ ऑक्टोबर २००० या दोन दिवसांत Indian Army ला करावे लागले 'ऑपरेशन राहुल'.

70
२७ आणि २८ ऑक्टोबर हे दोन दिवस भारतीय सैन्यासाठी (Indian Army) कदापि विस्मृतीत जाणारे नाहीत. या दोन दिवसांत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अत्यंत अमानवीय कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानी सैन्याला असा धडा शिकवला होता, ज्याच्या नंतर पाकिस्तानी सैन्यांनी कधीच पुन्हा तशी चूक केली नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्यांनी ‘ऑपरेशन राहुल’ केले. हे ऑपरेशन का आणि कशासाठी करण्यात आले, याविषयी सध्याचे संरक्षण मंत्रालयातील सल्लागार, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे यांनी प्रथमच माहिती दिली. झी न्यूज या वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी याची सविस्तर माहिती दिली. २७ आणि २८ ऑक्टोबर २००० या दोन दिवसांत हे ऑपरेशन करण्यात आले.

पाकिस्तानी जवानांनी भारतीय जवानाचे शीर कापून फुटबॉल खेळला

१९९९ मध्ये कारगिलची लढाई झाली होती, जगाला वाटले होते की, ही लढाई संपली, पण नियंत्रण रेषेवर लढाई सुरुच होती. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम (बॅट)ने भारताच्या नियंत्रण रेषेजवळील पोस्टवर लपून हल्ला केला होता. त्यात आमच्या मराठा बटालियनचे १० जवान ठार झाले. ही भारतीय सैन्यासाठी (Indian Army) खूप दुःखद बाब मानली जात होती. ती खूप छोटी पोस्ट होती. पाकिस्तानच्या BAT मध्ये जवान आणि दहशतवादीही होते. ज्या पोस्टमधून त्यांनी एक जवान घेऊन गेले, त्याचे त्यांनी शीर कापले आणि त्याचा फुटबॉल खेळला, नंतर ते शीर परवेझ मुशर्रफ याला भेट केले. त्यावर मुशर्रफने त्या पाकिस्तानी जवानांना एक लाख रुपये बक्षीस दिले, असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे यांनी सांगितले.

भारतीय जवानांनी बदला घेण्याचा केला निश्चय 

त्यानंतर याचा बदला घेण्याचे ठरले. मराठा बटालियन आणि  १४ गढवाल बटालियन यांना टास्क दिला. सगळ्या ब्रिगेडियरचा प्लॅन ऐकण्यात आला, माझा प्लॅन ऐकल्यानंतर त्यावर काम करण्याचे ठरले. प्रत्येक बटालियनमध्ये एक घातक युनिट असते, त्यामध्ये तरुण असतात, त्यांचा यासाठी वापर करण्याचा विचार झाला, मग विचार झाला हे काम माझ्या बटालियनचे जवान का करू शकणार नाही. म्हणून मग हे काम गढवाल रायफल्सला देण्यात आले. ज्या कंपनीच्या पोस्टसमोरील पोस्टवर हल्ला करायचा आहे, त्याच कंपनीच्या बटालियनला जबाबदारी देण्यात यावी, असा नियम आहे. त्यावेळी त्या पोस्टचे प्रमुख अमिताभ रॉय होते, जे यासाठी अत्यंत योग्य होते, असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे म्हणाले. (Indian Army)

असा केला हल्ला   

यासाठी २ अधिकारी आणि १६ जवान अशी टीम दिवस-रात्र ट्रेनिंग करू लागली. आम्ही रेकी देखील केली, इतकी तयारी केली कि आम्ही शत्रूच्या बंकरमध्ये जे बोलणे होत होते तेही ऐकू शकत होतो. आम्ही लागलीच गोळीबार करू लागलो. त्यावेळी प्रथमच एखाद्या ऑपरेशनसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. २७ आणि २८ ऑक्टोबर २००० च्या रात्री हे ऑपरेशन सुरु केले. रात्री आम्ही आमचे ठिकाण ठरवून घेतले. नाल्यात उतरलो. हे ऑपरेशन रॉकेट लॉन्चरच्या फायरिंगने सुरु झाले. आम्ही शत्रूचे बँकर उद्ध्वस्त केले. असे दोन बंकर उद्धवस्त केले. तोपर्यंत शत्रूला कळलेच नाही काय सुरु आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. आमची तीन जणांची एक तुकडी एका बंकरला टार्गेट करणार होती, मात्र त्याचवेळी त्या बंकरमधून आमच्या दिशेने ग्रेनाईड येऊ लागले. त्यावेळी सुभेदार हर्षवर्धन प्रसाद यांनी आमचे सहकारी अधिक जखमी होऊ नये म्हणून ते पुढे गेले, त्यांचा पाय निखळला होता, तरीही त्यांनी बंकरमधील सगळ्यांना संपवले आणि परतले. त्यावेळी मला अभिमान वाटला होता, अशी आठवण लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे यांनी सांगितली.  (Indian Army)

तुम्ही कधीही तुमच्या साथीदाराला मागे सोडून जायचे नाही असा आमच्यात नियम आहे. एक बंकरकडे सुभेदार गब्बर सिंह अगदी बेशुद्ध पडले होते, वजनाने भारी असले तरी आम्ही त्यांना उचलून घेऊन आलो आणि त्यांचा जीव वाचला. दोन दिवस आम्ही नर्गिस, खंजर पोस्टवर फायरिंग करत राहिलो, त्यामुळे शत्रूचे रिंगकट्टू पोस्टवरून पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यानंतर आम्ही त्या पोस्टला उद्धवस्त केले.

‘ऑपरेशन राहुल’ नाव का दिले? 

या ऑपरेशनसाठी मेजर रॉय यांना वीर चक्र मिळाले. भारतीय सैन्याने शिकवलेल्या धड्यानंतर पाकिस्तानने अनेक कमांडर आणि सैन्य अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. पाकिस्तानला मोठा धडा मिळाला होता, त्यांनी जर यापुढे असे कृत्य केले तर त्यांची खैर नाही, असा संदेश त्यांना मिळाला होता. ब्रिगेडियर अमिताभ रॉय यांच्या मुलाचे नाव राहुल होते, म्हणून मी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन राहुल’ असे नाव दिले, असेही लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे म्हणाले. (Indian Army)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.