
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुप्त योजनाच फुटल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. हुती बंडखोरांवर हल्ला करण्याची गुप्त योजना (America War Plan Leak) एका पत्रकाराच्या हाती लागली. यामुळे अमेरिकन प्रशासनाच्या कारभारवर सगळीकडून एकच टीका होत आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेत कोण अशी चूक करतेय, कोण घर का भेदी आहे, याची चौकशी सुरू झाली आहे. (America War Plan Leak)
“WAR PLAN LEAK”
By: Jeffrey G.The WH confirmed it’s authentic.
So Waltz is regularly talking to Jeffrey who endlessly attacking Trump for years?
Media asked Trump: It’s the first time he heard about it (war plan leak) https://t.co/V82HWjFm9C
— The Expert ⚡️ (@tsaitsai93) March 25, 2025
यमनमधील हुती बंडखोरांवर अचानक ताबडतोब हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती. ही गुप्त योजना अंमलात आणण्यासाठी एका मॅसेजिंग ॲपवर लष्करातील मुख्य अधिकारी, गुप्तहेर खाते, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनातील अधिकारी यांचा एका ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवर सर्व संवेदनशील माहिती शेअर करण्यात येत होती. यामध्ये यमनमधील हुती बंडखोरांवर कधी आणि केव्हा हल्ला करण्यात येणार? कोणत्या शस्त्रांचा वापर त्यासाठी करण्यात येणार, किती सैनिकांचा समावेश असेल? अशी टॉप सीक्रेट माहिती होती. (America War Plan Leak)
हेही वाचा-Kuno National Park मधून बाहेर आले 5 चित्ते ; ग्रामस्थांची दगडफेक
पण बड्या अधिकाऱ्यानेच एक मोठी चूक केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) माईक वॉल्ट्ज यांनी मॅसेजिंग ॲप Signal मध्ये The Atlantic मासिकाचे संपादक जेफरी गोल्डबर्ग (Jaffrey Goldberg) यांना या ग्रुपमध्ये जोडण्याची विनंती केली. या ग्रुपमध्ये उपराष्ट्रपती जेडी वेंस, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, एनएसएचे माईक वॉल्ट्ज, गुप्तहेर खात्याचे सर्व प्रमुख यांचा समावेश होता. (America War Plan Leak)
Houthi PC Small Group या नावाने Signal या ओपन सोर्सवर हा ग्रुप तयार करण्यात आला होता. जेफरी गोल्डबर्ग यांना या ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. त्यावेळी त्यांनाही हा काय प्रकार आहे, हे कळेना. पण त्यांनी बारकाईने हा प्रकार पाहिल्यावर त्यांना कळाले की त्यांना एका टॉप सीक्रेट गटात सहभागी करून घेण्यात आले आहे. तर या ग्रुपवर हुती बंडखोरांवर हल्ला होण्यासंदर्भात गोल्डबर्ग यांनी त्यांच्या मासिकात एक लेख लिहिला. या ग्रुपवर हुतींवरील हल्ल्याचा प्लॅनच शेअर करण्यात आल्याने त्यांच्या लेखाला अचुकता आली. अर्थात संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी हे सर्व आरोप फेटाळले आणि गोल्डबर्ग हा अत्यंत धोकेबाज माणूस असल्याचा आरोप केला. (America War Plan Leak)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community