अमेरिकेच्या २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची टक्कर, ९ जणांचा मृत्यू

71

जगातील सर्वात शक्तीशाली असलेल्या अमेरिकेच्या हवाई दलाबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. अत्याधुनिक अशा ब्लॅक हॉक (Blackhawk helicopter) ला अपघात झाला आहे. हवेतच दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंटुकी भागातील बुधवारी रात्री सरावा दरम्यान ही घटना घडली आहे. गव्हर्नर एंडी बेशियर यांनी सांगितले की, आमच्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यात काही जणांचा मृत्यूची माहिती समोर आली आहे. स्थानिय अधिकारी आणि बचावपथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. अमेरिकेच्या हवाई दलामध्ये ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आपल्या क्षमतेमुळे ओळखले जाते. व्हिएतनामा युद्धानंतर या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली होती. जगभरात अमेरिकेचे मित्र राष्ट्र स्पेशल फोर्समध्ये ब्लॅक हॉकचा वापर करतात. विशेष ऑपरेशनसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. या हेलिकॉप्टरचा वेग हा इतर हेलिकॉप्टरच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.