केंद्र सरकारने CISF च्या महिला बटालियनच्या (Women’s Battalion) स्थापनेला मान्यता दिली आहे. या बटालियनमध्ये 1000 हून अधिक महिलांचा समावेश असेल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या बटालियन कमांडोप्रमाणे सुरक्षा पुरवतील. सध्या देशात 12 CISF बटालियन आहेत, पण त्यामध्ये एकही महिला बटालियन नाही. ही पहिली बटालियन असेल, ज्यामध्ये फक्त महिला असतील. (Amit Shah)
भरती प्रक्रिया कधी सुरू होणार?
5 मार्च 2022 रोजी 53 व्या CISF दिनानिमित्त अमित शाह (Amit Shah) यांनी महिला बटालियन स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता त्याला मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. CISF लवकरच पहिल्या सर्व-महिला बटालियनसाठी भरती प्रक्रिया सुरू करेल. सीआयएसएफचे डीआयजी दीपक वर्मा म्हणाले की, गृह मंत्रालयाच्या मान्यतेने यावर काम सुरू करण्यात आले आहे. सध्या CISF मध्ये महिलांची संख्या सुमारे 7% आहे. (Amit Shah)
In a firm step towards realizing Modi Ji’s vision of enhancing women’s participation in every field of nation-building, the Modi government has approved the establishment of the first all-women battalion of the CISF.
To be raised as an elite troop, the Mahila Battalion will… pic.twitter.com/AHJWKsG0Xa
— Amit Shah (@AmitShah) November 13, 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी (13 नोव्हें.) या महिला बटालियनला मंजुरी दिली. बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या महिला सैनिकांना विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि व्हीआयपींच्या सुरक्षेत कमांडोप्रमाणे तैनात केले जाईल. गरजेनुसार ते इतर ठिकाणीही तैनात केले जातील.
अमित शहा काय म्हणाले? (Amit Shah)
राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनातून एक ठोस पाऊल उचलत सीआयएसएफच्या पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. सीआयएसएफची महिला बटालियन लवकरच देशातील विमानतळ आणि मेट्रो रेल्वेचे संरक्षण आणि कमांडो म्हणून व्हीआयपींना सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी स्वीकारणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community