केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (७ नोव्हें.) राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘दहशतवाद विरोधी परिषद-2024’ चे (Counter Terrorism Council-2024) उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र लवकरच राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जारी करणार असल्याचे सांगितले. मोदी (PM Modi) सरकारने गेल्या 10 वर्षांत दहशतवादाविरोधात पावले उचलली असून त्यामुळे दहशतवादाशी लढण्यासाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण झाली आहे. असंही ते म्हणाले. (Amit Shah)
We are committed to eradicating terrorism. Addressing the inaugural session of the ‘Anti-Terror Conference-2024’ in New Delhi. https://t.co/jeE3L9JN0m
— Amit Shah (@AmitShah) November 7, 2024
‘दहशतवाद विरोधी परिषद-2024’ विषयी बोलताना अमित शाह (Amit Shah) पुढे म्हणाले, “2014 पासून दहशतवादी घटनांमध्ये 70% घट झाली आहे. म्हणजे दहशतवाद्यांचे वय घटले आहे. त्यांचे आयुष्य आता वर्षानुवर्षे कमी झाले आहे. पंतप्रधान मोदींचा दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्सचा नारा केवळ भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने स्वीकारला आहे. या परिषदेमुळे भारतातील सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढेल.”
(हेही वाचा-Indian Railway: भारतीय रेल्वेचे नवीन अॅप लाँच, तिकीट ते जेवण सर्व एका क्लिकवर!)
“दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) या परिषदेत गेल्या काही वर्षांत दहशतवादाविरोधातील कारवाईत आलेल्या अडचणींवर चर्चा होणार आहे. या परिषदेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, विशेष सुरक्षा संस्था, फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ञ सहभागी होणार आहेत.” (Amit Shah)
(हेही वाचा-Jammu & Kashmir : कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा!)
“राज्य आणि केंद्र सरकारने मिळून गेल्या 10 वर्षांत जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार नियंत्रित केला आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या 632 गुन्ह्यांपैकी 498 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सुमारे 95% प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे.” अशी माहिती अमित शाह यांनी दिली. (Amit Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community