Amritsar Temple Blast: अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर !

Amritsar Temple Blast: अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर !

67
Amritsar Temple Blast: अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर !
Amritsar Temple Blast: अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर !

पंजाबच्या अमृतसरमधील (Amritsar Temple Blast) खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिराबाहेर तीन दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ला (Grenade attack) करण्यात आला होता. सोमवारी (१७ मार्च) सकाळी पोलिसांनी दोन पैकी एका हल्लेखोराला चकमकीत ठार केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपीचे नाव गुरसिदक ऊर्फ सिदकी ऊर्फ जगजीत सिंग असे आहे. तर त्याचा साथीदार चुई ऊर्प राजू सध्या फरार आहे. (Amritsar Temple Blast)

हेही वाचा-Jalyukt Shivar योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘या’ फाऊंडेशन सोबत करार झाल्याची राज्य सरकारची घोषणा

अमृतसर येथील विमानतळ मार्गावर हल्लेखोर आणि अमृतसर पोलीस यांच्यात आज सकाळी चकमक झाली. ज्यात एका हल्लेखोराला ठार करण्यात आले. शुक्रवारी रात्री ठाकूरद्वारा मंदिराबाहेर ग्रेनेड फेकण्यात आला होता. पोलिसांनी मंदिराबाहेर सीसीटीव्ही हस्तगत करून त्यात दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले असल्याचे सांगितले होते. रात्री १२.३५ वाजता दोन हल्लेखोर दुचाकीवरून मंदिराजवळ आले. यावेळी त्यांच्या हातात एक झेंडा होता. थोडा वेळ मंदिराबाहेर थांबल्यानंतर त्यांनी ग्रेनेड हल्ला केला. (Amritsar Temple Blast)

हेही वाचा-Maharashtra Vidhan Parishad : विधानपरिषदेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले !

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या परिसरात एका व्यक्तीने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात पाच जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर काही दिवसांनी ठाकूरद्वारा मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. (Amritsar Temple Blast)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.