Air Force च्या अधिकाऱ्याने हेलिकॉप्टरमधून उडी घेतली, पण पॅराशूट उघडलेच नाही…

612

Air Force : गुजरातमधील जामनगर येथे जग्वार जेट अपघातात (Jaguar Jet crash) एका लढाऊ वैमानिकाचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी उत्तर प्रदेश आग्रा (Uttar Pradesh Agra) येथे भारतीय वायुसेनेच्या (Indian Air Force) आकाश स्कायडायव्हिंग संघाचे पॅरा जंप प्रशिक्षक (Indian Air Force para jump instructor dies) वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी (Ramkumar Tiwari) जखमी झाले असून, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी (५ एप्रिल) ही धक्कादायक घटना घडली. (Air Force)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान ते जखमी झाले.  रामकुमार तिवारी यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतली, पण काही बिघाडामुळे त्यांचे पॅराशूट वेळेवर उघडू शकले नाही. यामुळे ते थेट खाली पडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी डेमो ड्रॉप (Agra Demo Drop) दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. दरम्यान लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(हेही वाचा – Rama Navami : आधी रामललाचा ‘सूर्य तिलक’ आणि आता दीपोत्सव; लाखो दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी)

वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांच्यासाठी, भारतीय हवाई दलाने आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिले की, “आयएएफच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीमच्या पॅरा जंप प्रशिक्षकाचे आज आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. वायुसेना या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त करते आणि कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.” या प्रकरणाबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक भोसले यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून मिळाली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.