दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag Encounter) जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झालेली चकमक आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आज सुरक्षा दलाच्या मोठ्या शोधमोहिमेत १ हजारांहून जास्त अधिक सुरक्षा कर्मचारी गुंतले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल चकमकीच्या ठिकाणाजवळ एक जळालेला मृतदेह सापडला होता, ज्याचा पोषाख अतिरेक्याचा होता. जंगलात लष्करी कारवायांमध्ये एक्सपर्ट मानले जाणारे कोब्रा कमांडोही दहशतवाद्यांच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Prime Minister Narendra Modi : भारत सगळी स्वप्ने, संकल्प निर्विघ्नतेने पूर्ण करेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास)
चकमकीत TRF अतिरेकी उझैर अहमदच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून मृतदेह कोणाचा आहे, हे स्पष्ट होईल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या ८१ सक्रीय अतिरेकी आहेत. ज्यात पाकिस्तानी वंशाचे ४८ विदेशी दहशतवादी आणि ३३ स्थानिक दहशतवादी आहेत.
या चकमकीबाबत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, सैनिकांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल. गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याबद्दल बोलताना प्रत्येक हुतात्मा जवानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल. देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यामुळे आता शत्रूंची खैर नाही, कारण कोब्रा कमांडोज जंगलात लपलेले दहशतवादी शोधतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community