चीनला युद्धाच्या वेळी हिमालयाच्या उंच पर्वत रांगांवरून चोख प्रतिकार करण्याची क्षमता असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी थेट हिमालयाच्या कुशीत करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राने लक्ष्य अचूक भेदले. पोखरण नंतर लागलीच हिमालयात या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. भारतीय सैन्याने आणि हवाई दलाने डीआरडीओसोबत ही चाचणी केली आहे.
As part of ongoing user validation trials, Anti-Tank Guided Missile ‘HELINA’ successfully flight tested again today for a different range and altitude.@PMOIndia @DefenceMinIndia @SpokespersonMoD @adgpi @IAF_MCC pic.twitter.com/CxgpoV6R5p
— DRDO (@DRDO_India) April 12, 2022
२४ तासांत राजस्थान आणि हिमालय दोन्ही ठिकाणी चाचणी
हिमालयात हे क्षेपणास्त्रा अॅडवान्स लाईट हेलिकॉप्टरमधून डागण्यात आले होते. तर या चाचणीच्या २४ तास आधी राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र हेलिनाने सर्व मानकांची पूर्तता करत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला होता. या भागामध्ये चिनी आक्रमणाचा धोका आहे. काश्मीर आणि लडाखची परिस्थिती सारखीच आहे. यामुळे या पहाडी भागातील परकीय आक्रमणावेळी हे क्षेपणास्त्रा कसे काम करते, उंचीवरून डागले तर ते समोरील लक्ष्य किती अचूक भेदते यासाठी ही चाचणी घेण्यात आली. यासाठी हेलिकॉप्टरचे अंतरही दूर ठेवण्यात आले होते. हे पाहण्यासाठी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी, डीआरडीओचे वैज्ञानिक उपस्थित होते. मिसाईल लाँच केल्यानंतर हे तंत्रज्ञान सक्रिय होतं. हे जगातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अँटी टँक हत्यारांपैकी एक आहे. भारतीय लष्कर आणि हवाईदलाच्या हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारी सुरू आहे. खरं तर याचे नाव हेलिना आहे परंतु याला ध्रुवास्त्र असेही म्हटले जाते. यापूर्वी याचे नाव नाग मिसाईल होते.
Join Our WhatsApp Community