Atmanirbhar Bharat: सैन्यासाठी 4.25 लाख स्वदेशी कार्बाइन बनवणार

केंद्र सरकारने दिली मान्यता

‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने भारतीय लष्करासाठी 4.25 लाख स्वदेशी कार्बाइन तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार 5.56×45 मिमी. 4,25,213 क्लोज क्वार्टर कार्बाइन्स (CBQs) च्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बाइन्सच्या उत्पादनाला वेळ लागणार आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी खासगी किंवा सार्वजनिक अशा दोन उत्पादकांशी करार करण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी 5 हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 4,25,213 लाख सीबीक्यूच्या उत्पादनात बराच वेळ लागेल, त्यामुळे खाजगी किंवा सार्वजनिक अशा दोन उत्पादकांना हे कंत्राट देण्याची योजना आहे. त्यानुसार सर्वोत्तम बोली लावणाऱ्या कंपनीला 2 लाखांहून अधिक कार्बाइन्स तयार करण्याची ऑर्डर मिळू शकते तर इतर फर्मला उर्वरित कार्बाइन्स तयार करण्यासाठी करारबद्ध केले जाईल. लवकरात लवकर कार्बाइनचा पुरवठा करणे हा त्यामागील प्राधान्य असेल. साधारणपणे, करारावर स्वाक्षरी करण्यासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो परंतु संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) मंजुरी मिळाल्यानंतर, सशस्त्र दलांच्या गरजा लक्षात घेऊन हे करार लवकरात लवकर केले जाऊ शकतात.

करार अंतिम टप्प्यात 

भारतीय लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) शस्त्रास्त्र निर्माता कंपनी कॅराकलला 5.56×45 मि.मी. वली यांना 2018 मध्ये 93 हजार 895 क्लोज क्वार्टर कार्बाइन्स (सीबीक्यू) पुरवठ्यासाठी निवडण्यात आले होते. हा करार जवळपास अंतिम टप्प्यात आला होता, पण दरम्यानच्या काळात संरक्षण मंत्रालयाने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत संरक्षण उद्योगाला बळकटी देण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी घातली होती. यानंतर, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर 2020 मध्ये झालेल्या बैठकीत हा करार रद्द करण्यात आला. आता ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने 4.25 लाख स्वदेशी कार्बाइन तयार करण्यात येणार आहेत. लष्कराला सीबीक्यू ची नितांत गरज आहे, त्यामुळे हा करार लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here