आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल नरवणे?

136

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने बुधवारी देशभरात शोककळा पसरली. 8 डिसेंबरचा दिवस एका कधीही न भरून येणार्‍या नुकसानाने संपेल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी भारतीय लष्कराला बळकट करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात अनेक अभिनव प्रयत्न केले होते. त्यांच्या निधनाने संरक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता प्रश्न उपस्थित होतो की सीडीएस पदासाठी पुढील पात्र व्यक्ती कोण असेल? देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाच्या हाती दिली जाणार?

लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वय साधण्यासाठी सीडीएसचे पद निर्माण करण्यात आले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद लष्कराच्या तीन प्रमुखांपेक्षा वरचे असते. एवढेच नाही तर या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. जनरल बिपिन रावत हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुखही होते. ते तिन्ही लष्करी सेवांचे प्रशासकीय कामकाज पाहत असत. देशातील सर्व सुरक्षा एजन्सी, संघटना आणि सायबर ऑपरेशन्सची कमांड चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या हातात असते.

बैठकीत पुढील सीडीएसच्या नावावर चर्चा झाली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बुधवारी बैठक झाली. सीसीएसच्या या बैठकीत Mi-17 V5 अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. मात्र, या बैठकीत पुढील सीडीएसच्या नावावरही चर्चा झाल्याची चर्चा आहे. सीडीएस पदासाठी  पात्र असलेलं  एक नाव समोर येत आहे ते म्हणजे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं. यानंतर, आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांचा नावाचाही विचार केला जात आहे.

सीडीएस पदावर लवकर नियुक्ती करण्याची नितांत गरज 

पूर्व लडाखमध्ये 19 महिन्यांपासून चीनसोबत लष्करी संघर्ष सुरू आहे. हे लक्षात घेता, लष्कर, नौदल आणि भारतीय वायुसेना यांना थिएटर कमांडमध्ये एकत्रित करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये खरेदी, नियोजन, प्रशिक्षण आणि तत्त्वांच्या बाबतीत आवश्यक समन्वय निर्माण करण्यासाठी सीडीएस पदावर लवकर नियुक्तीची नितांत गरज आहे. जनरल रावत यांनी संपूर्ण प्रक्रिया सुरू केली होती, परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे हे काम अपूर्ण राहिले आहे, ते जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.