भारतीय सैन्य दिवस : ट्विटरवरही सैन्याच्या तिन्ही दलास दिली मानवंदना

भारतीय लष्करातर्फे शनिवारी 74 वा सैन्य दिवस साजरा केला जात आहे. देशात दरवर्षी 15 जानेवारीला सेना दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1949 साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर हे ब्रिटिश भारताचे शेवटचे लष्कर प्रमुख होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ त्यांनीच भारतीय लष्कराचं प्रतिनिधीत्व केलं. नंतर 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सूत्रे हातात घेतली. या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

ट्विटर ट्रेंड

आर्मी दिनाच्या निमित्ताने ट्विटरवर हॅशटॅग आर्मी डे ट्रेंड होत आहे. तसेच, राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून भारतीय लष्कराला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या खास दिनाच्या निमित्ताने खादी स्मारकाकडून भारताचा तिरंगा ध्वज लोंगेवाला येथे प्रदर्शित केला गेला.

( हेही वाचा :अरेरे…बेपत्ता मायलेकराचे मृतदेह सापडले नाल्यात )

भारतीय लष्कराविषयी

ईस्ट इंडिया कंपनीने 1776 मध्ये कोलकाता येथे भारतीय लष्कराची स्थापना केली. भारतीय लष्कर हे चीन आणि अमेरिकेसह जगातील तीन मोठ्या सैन्यांपैकी एक आहे. भारतीय लष्कर समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटर उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तैनात आहे. ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे.  भारताकडे जगातील सर्वात मोठी स्वयंसेवक सेना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here