लष्कराचे हेलिकॉप्टर बुधवारी, ८ डिसेंबर रोजी तामीळनाडू येथील कोन्नूर या ठिकाणी कोसळले. त्यात चीफ अॉफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपीन रावत यांचा समावेश होता. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा त्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर १ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता वायु सेनेने या अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांचा पत्नी मधुलिका यांचा मृतांमध्ये समावेश होता, असे कळवले आहे. यात ग्रूप कॅप्टन वरूण सिंग यांच्यावर सैन्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
I am deeply anguished by the helicopter crash in Tamil Nadu in which we have lost Gen Bipin Rawat, his wife and other personnel of the Armed Forces. They served India with utmost diligence. My thoughts are with the bereaved families.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021
Deeply anguished by the sudden demise of Chief of Defence Staff Gen Bipin Rawat, his wife and 11 other Armed Forces personnel in an extremely unfortunate helicopter accident today in Tamil Nadu.
His untimely death is an irreparable loss to our Armed Forces and the country.
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 8, 2021
With deep regret, it has now been ascertained that Gen Bipin Rawat, Mrs Madhulika Rawat and 11 other persons on board have died in the unfortunate accident.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
हवामान खराब झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. हे हेलिकॉप्टर जेव्हा खाली कोसळले, तेव्हा त्याने पेट घेतला. त्यातून ३ जणांना वाचवण्यात आले आहे, घटनास्थळीच ४ मृतदेह सापडले होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एसएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी यांच्यासह एकूण १४ जण होते. या अपघाताच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. हे हेलिकॉप्टर अधिक सुरक्षित असते, त्याला दोन इंजिन असते. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर वापरले जाते. त्याच्या उड्डाणपूर्वी हे हेलिकॉप्टर तपासले जाते.
Join Our WhatsApp Community