भारतीय लष्कर थिएटर कमांडच्या दिशेने, सीमेवर तयारी सुरू!

68

संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना सेवा मुख्यालयांना थिएटर कमांडच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. चीनच्या सीमेवर देखरेख करणाऱ्या भारतीय लष्कर कमांडच्या सीमा पुन्हा आखण्याच्या दिशेने काम केले जात आहे. चीनने याआधीच मिश्र घटक ब्रिगेडसह त्यांच्या थिएटर कमांड एकत्रित केल्या आहेत आणि आता या कमांड्स पाकिस्तानला युद्धप्रणालीमध्ये सुधारणा करण्यास मदत करत आहेत.

प्रतिसाद देण्यासाठी १८० दिवस

लष्कर विभागाने संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढण्यासाठी व तिन्ही सैन्यांमधील संयुक्तता सुधारण्यासाठी थिएटर कमांड तयार करण्यास सांगितले आहे. या प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने १८० दिवस दिले आहेत. हे थिएटर कमांड २०२२च्या वर्षाखेरीस कार्यरत होतील, असा अंदाज वरिष्ठ लष्कर कमांडर यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : नार्को टेररिझम  दहशतवादापेक्षाही  अधिक गंभीर! प्रवीण दीक्षित यांचे मत )

चीन सीमेवर लक्ष

सध्याचे युनियन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय डिमरी हे पूर्व थिएटर कमांडसाठी अभ्यास करत आहेत, जे हिमाचल प्रदेश ते अरुणाचल प्रदेश पर्यंत असलेल्या संपूर्ण चीन सीमेवर लक्ष ठेवेल. पुढे, हेच कमांड उत्तर जम्मू, काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांवर देखरेख करेल. कारण हा संपूर्ण प्रदेश अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे हा प्रदेश हळूहळू थिएटर कमांड अंतर्गत आणला जाईल.

थिएटर कमांड म्हणजे काय ?

देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून तिन्ही सैन्यदल आणि देशाच्या इतर लष्करी दलांना एकत्र आणले जाणार आहे. या कमांडचा एकच ऑपरेशनल कमांडर असणार आहे. थिएटर कमांडमुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्यास मदत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.