जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बांदीपोरा (Bandipora Army Accident) जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवान हुतात्मा झाले आहेत तर दोघे जखमी झाले. हा अपघात बांदीपोरा जिल्ह्याच्या एस के पायन परिसरात घडला. या मार्गावरून जात असताना हे वाहन घसरून दरीत कोसळले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bandipora Army Accident)
लष्कराच्या चिनार कोअरने ‘एक्स’वर माहिती दिली की, ‘‘बांदीपोरा जिल्ह्यामध्ये कर्तव्यावर असताना वाईट हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे लष्कराचे वाहन दरीत कोसळले. स्थानिक काश्मिरींच्या मदतीने जखमी जवानांची त्वरित सुटका करण्यात आली. मात्र, या दुर्दैवी अपघातात तीन जवान हुतात्मा झाले.’’ स्थानिकांनी तात्काळ केलेल्या मदतीबद्दल लष्कराने त्यांचे आभार मानले. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. जवानांनी बजावलेली सेवा आणि कटिबद्धता यासाठी देश कृतज्ञ आहे, असे ते म्हणाले. (Bandipora Army Accident)
पंधरा दिवसांतील तिसरा अपघात
जम्मू-काश्मीरमधील गेल्या १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ३१ डिसेंबर रोजी सैन्यदलाचे वाहन जवळपास १०० फूट खोल दरीत कोसळले होते. या अपघातात पाच जवान हुतात्मा झाले तर पाच जण जखमी झाले होते. त्यापूर्वी २४ डिसेंबरला पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये शोधमोहिमेवर असलेले सैन्यदलाचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळून पाच जवान हुतात्मा झाले होते. (Bandipora Army Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community