मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर शनिवारी, १३ नोव्हेंबर रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोरआली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कारातील कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तसेच अन्य चार जवान देखील हुतात्मा झाले आहेत.
म्यानमार सीमेजवळ हल्ला घडला
मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार सकाळी जवळपास १० वाजता मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ घडली. आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे पूर्वांचल येथील सीमाभागांतील राज्यांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याची गंभीरतेने दखल घेतली.
(हेही वाचा : राज्यातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत! नितेश राणेंचा आरोप)
Join Our WhatsApp Community