Manipur मध्ये मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ले; जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव

26
Manipur मध्ये मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ले; जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव
Manipur मध्ये मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ले; जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव

मणिपूर-आसामच्या (Manipur) सीमेवरील जिरी व बराक नद्यांच्या संगमावर तीन मृतदेह आढळले होते. हे मृतदेह ११ नोव्हेंबर रोजी कुकी कट्टरवाद्यांनी जिरीबाम येथून अपहरण केलेल्या सहा लोकांपैकी असल्याचा संशय आहे. याच दिवशी सुरक्षा दलाने १० बंदूकधारी कट्टरवाद्यांना ठार केले होते. कुकी संघटनेने या दहा जणांची ओळख व्हिलेज गार्ड म्हणून सांगितली. नदीत मृतदेह आढळून आल्यानंतर राज्याने खबरदारी म्हणून राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान, मंत्री, आमदार तसेच सर्व राजकीय पक्ष कार्यालयांची सुरक्षा वाढवली होती.

मात्र, शनिवारी (१६ नोव्हें.) एक महिला व दोन मुलांचे मृतदेह जिरी नदीत सापडल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मैतेईबहुल इंफाळ खोऱ्यात तीन मंत्री आणि भाजपच्या सहा आमदारांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ला केला. जमावाने सीएम बिरेन सिंग (CM Biren Singh) यांचे जावई आरके इमो सिंग (RK Imo Singh) यांच्या घरालाही लक्ष्य केले. रात्री उशिरा संतप्त जमाव मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला होता. निदर्शकांना हटवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रुधुराचा वापर केला. (Manipur)

अफ्स्पा हटवण्याची मागणी
हवेत गोळीबारही केला. पाच जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सात जिल्ह्यांत संचारबंदी व इंटरनेट बंद केले. काही मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली आहे. मणिपूर सरकारने केंद्राला पत्र पाठवून सहा ठिकाणी लागू असलेला सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम (अफ्स्पा) हटवण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने १४ नोव्हेंबरला जिरीबाम हिंसेनंतर तो लागू केला. (Manipur)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.