AUSTRAHIND-23 : भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना; संयुक्त लष्करी सराव करणार

81 जवानांचा समावेश असलेली भारतीय सशस्त्र दलाची तुकडी आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. उभय देशांमध्‍ये सरावाची आता दुसरी फेरी होणार आहे. सराव कार्यक्रम 22 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणार आहे.

180
AUSTRAHIND-23 : भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना; संयुक्त लष्करी सराव करणार
AUSTRAHIND-23 : भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना; संयुक्त लष्करी सराव करणार

ऑस्ट्रेलियाबरोबर संयुक्त लष्करी सराव करण्यासाठी ‘ऑस्ट्राहिंद-23’ (AUSTRAHIND-23) ही 81 जवानांचा समावेश असलेली भारतीय सशस्त्र दलाची तुकडी आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. उभय देशांमध्‍ये सरावाची आता दुसरी फेरी होणार आहे. सराव कार्यक्रम 22 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणार आहे. (AUSTRAHIND-23)

(हेही वाचा – Karpur Gauram : कर्पूरगौरं करुणावतारं…; सर्व पूजांमध्ये म्हटला जाणारा मंत्र)

सहयोगात्मक भागीदारी वाढवण्याचे ध्येय

AUSTRAHIND या संयुक्त सरावाला 2022 मध्ये सुरुवात झाली आणि पहिली फेरी महाजन, राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. हा वार्षिक प्रशिक्षण सराव उपक्रम असून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दर वर्षाआड अनुक्रमे करण्याचे नियोजित केलेले आहे.

या सरावाचा उद्देश सहयोगात्मक भागीदारी वाढवणे आणि दोन्ही बाजूंमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण (सामायिक) करणे हा आहे. (AUSTRAHIND-23)

(हेही वाचा – ICC Rankings ODI : आयसीसी क्रमवारी जाहीर; कोणता खेळाडू कोणत्या स्थानावर)

या संयुक्त सरावामुळे विचारांच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन मिळेल आणि सामरिक कारवायांसाठी रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यांचा संयुक्तपणे अभ्यास होईल. या प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये ‘स्निपर’ गोळीबार आणि परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्तपणे पाळत ठेवणे, तसेच संप्रेषण उपकरणे चालवणे समाविष्ट आहे. कंपनी/बटालियन स्तरावर रणनीतीच्या कृतींसोबतच अपघाताचे व्यवस्थापन आणि त्यातून बाहेर येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची तालीमही केली जाईल. (AUSTRAHIND-23)

या सरावामुळे दोन्ही लष्करांमधील सामंजस्य वाढण्यास आणि दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.