भारतीय नारीशक्तीची गगन भरारी! अवनी चतुर्वेदी रचणार इतिहास; ‘एरियल वॉर गेममध्ये’ सहभागी होणारी पहिली महिला पायलट 

भारतीय हवाई दलातील लीडर अवनी चतुर्वेदी नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक या देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी अवनी ही पहिली महिला पायलट ठरणार आहे. अवनीने यापूर्वीही अनेक इतिहास रचले आहेत.

( हेही वाचा : संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली; राज्यपालांबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य )

सुखोई उडवणारी पहिली महिला पायलट 

भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी सुखोई (Su-30MKI) लढाऊ विमान उडवणार आहे. परदेशी भूमीवर सुखोई उडवणारी अवनी ही पहिली महिला वैमानिक ठरणार आहे. परदेशी भूमीवर युद्धसरावासाठी तीन महिला लढाऊ वैमानिकांध्ये अवनीची निवड झाली आहे.

जपानमध्ये सरावाचे आयोजन 

वीर गार्डियन २०२३ हवाई सराव १६ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. हा सराव जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ओमिटामा येथील हयाकुरा एअर बेस त्याच्या जवळपासचे हवाई क्षेत्र आणि सायमा येथील इरुमा एअर बेस येथे या सराव केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here