
रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची (RSS headquarters) रेकी करून ती माहिती पाकिस्तानमधील उमर याला पाठविणारा दहतवादी रईस अहमद शेख याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. रईस जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पोरा येथील रहिवासी आणि जैश-ए-मोहम्मद या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. (RSS headquarters)
हेही वाचा-नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या ‘Auto-taxi’ चालकांची तक्रार करा ‘या’ व्हाट्सअप क्रमांकावर
दहशतवादी कृत्य करण्याच्या उद्देशाने आरएसएस मुख्यालय, रेशीमबागसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करणाऱ्या पोरा पुलवामा, जम्मू-काश्मीर येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी रईस अहमद शेखचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे. सरकारी वकिलांकडून जीपी आणि वरिष्ठ अॅडव्होकेट देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली तर अर्जदार आरोपीकडून अॅडव्होकेट निहाल सिंग राठोड यांनी बाजू मांडली. (RSS headquarters)
हेही वाचा- “लाडकी बहीणमुळे विकासाची गती कमी झाली आहे का?” CM Devendra Fadnavis म्हणाले …
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, शेखने शहरातील परिसरात असलेल्या आरएसएस मुख्यालयाचे सर्वेक्षण करण्याचा कट रचला होता, परंतु तो तसे करू शकला नाही. अधिवक्ता निहालसिंग राठोड यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जात शेख यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कोणत्याही बेकायदेशीर कृती करण्यासाठी वरील ठिकाणांची रेकी केली होती हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. तर शेख यांचे कृत्य बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या (UAPA) कक्षेत येत नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने न्यायालयात केला. सरकारी वकील देवेंद्र चौहान यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी शेख हा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे म्हटले. (RSS headquarters)
हेही वाचा- Sambhal News : राहुल गांधींना संभल न्यायालयाची नोटीस; ४ एप्रिलला उपस्थित रहाण्याचे आदेश
मुख्य सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ देवेंद्र चव्हाण यांनी रईसच्या दहशतवादी कनेक्शनबाबत न्यायालयाला ठोस माहिती दिली. रईसविरुद्ध यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत हातबॉंब बाळगल्याप्रकरणी खटला दाखल आहे. न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारावर रईसला जामीन नाकारला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याला कारागृहात ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. (RSS headquarters)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community