बांगलादेशमध्ये (Bangladesh Protests) राजकीय अस्थिरता निर्माण करणे आणि त्या माध्यमातून शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार पाडण्याचे कारस्थान पाकिस्तानच्या (Pakistan) आयएसआयच्या (ISI) संस्थेच्या सहाय्याने लंडनमध्ये आखले गेल्याची माहिती गूप्तचर यंत्रणाकडून मिळत आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सौदी अरेबियामध्ये बैठक
बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (BNP) प्रमुख आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि आयएसआय अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियामध्ये बैठक झाली होती, अशी माहिती बांगलादेशी अधिकाऱ्यांनी दिली असल्याचेही इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. (Bangladesh Protests)
सोशल मिडीयातून आंदोलकांना चिथावणी
एक्स साईटवरील काही बांगलादेशविरोधी हँडल्स हे सातत्याने आंदोलकांना चिथावणी देत होते. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी अशा शेकडो पोस्ट हेरल्या आहेत, ज्या शेख हसीना यांच्या सरकारविरोधी आहेत. पाकिस्तानी हँडल्सवरूनही काही पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला शेख हसीना यांचे सरकार घालवून पुन्हा एकदा बीएनपीची सत्ता स्थापन करायची आहे. बीएनपी पक्ष हा पाकिस्तानधार्जिणा पक्ष मानला जातो. शेख हसीना यांच्याविरोधातील आंदोलन तीव्र होऊन शेख हसीना या देशाबाहेर जाव्यात यासाठी चीननेही आयएसआयमार्फत प्रयत्न केले असल्याचे सांगतिले जात आहे. (Bangladesh Protests)
विद्यार्थी आंदोलन सुरू झाल्यानंतर तेथील सोशल मीडियाचे निरीक्षण केल्यानंतर समजते की, बीएनपी पक्षाकडून अवामी लिग पक्षाविरोधात बऱ्याच पोस्ट टाकण्यात आल्या. यात आंदोलकांविरोधात हिंसा होणारे व्हिडीओ, शेख हसीना यांचे फलक फाडतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले गेले. अमेरिकेशी संबंधित असलेल्या अकाऊंटवरून या चिथावणी देणाऱ्या पोस्ट आणखी वेगाने व्हायरल करण्यात आल्या. (Bangladesh Protests)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community