बांगलादेशात (Bangladesh Protests) आरक्षणासाठी उभारण्यात आलेलं आंदोलन हिंसक झालं आहे. या आंदोलनात सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी जीव गमावलाय. आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रवास सत्ता बदलापर्यंत झाला. शेख हसिना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होत भारतात पोहचल्या. बांगलादेशात लष्कराच्या अधिपत्याखाली आता नवीन सरकार स्थापण्याची तयारी सुरू आहे.
(हेही वाचा –Bangladesh Protests : Sheikh Hasina यांच्याबाबत पुढची योजना काय? सर्वपक्षीय बैठकीत S. Jaishankar यांनी सांगितले…)
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणौतने तिच्या एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले की, “भारत ही आपल्या आजूबाजूच्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी आहे. बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटत असल्याचा आम्हाला सन्मान आणि आनंद वाटतो.मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिमही नाही.” (Bangladesh Protests)
Bharat is the original motherland of all Islamic Republics around us. We are honoured and flattered that honourable Prime Minister of Bangladesh feels safe in Bharat but all those who live in India and keep asking why Hindu Rashtra? Why Ram Rajya? Well it is evident why!!!
No… https://t.co/wMqlpBquUo— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 5, 2024
(हेही वाचा –Bangladesh Protests : बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची खात्री झाली पाहिजे; विहिंपची मागणी)
“अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही रामराज्यात राहत आहोत.” असं कंगना रणौत म्हणाल्या आहेत. शेख हसीना यांनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या विरोधात देशात बराच काळ हिंसक आंदोलने होत होती. त्यांनी देश सोडला आणि सोमवारी लष्करी हेलिकॉप्टरने त्यांना भारतात आणण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, काही काळ भारतात राहिल्यानंतर त्या लंडनला जाऊ शकतात. (Bangladesh Protests)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community