Bangladesh Protests : Sheikh Hasina यांच्याबाबत पुढची योजना काय? सर्वपक्षीय बैठकीत S. Jaishankar यांनी सांगितले…

195
Bangladesh Protests : Sheikh Hasina यांच्याबाबत पुढची योजना काय? सर्वपक्षीय बैठकीत S. Jaishankar यांनी सांगितले...
Bangladesh Protests : Sheikh Hasina यांच्याबाबत पुढची योजना काय? सर्वपक्षीय बैठकीत S. Jaishankar यांनी सांगितले...

सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपण या प्रसंगात (Bangladesh Protests) सरकारच्या पाठिशी असल्याचं नमूद केलं. तसेच, यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी उत्तरं दिली. या आंदोलकांना शांत करण्यासाठी आता बांगलादेशचं लष्कर रस्त्यांवर उतरलं आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थितीचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी बांगलादेशमधील स्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

या बैठकीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे नेते टी. आर. बालू, जदयूचे लल्लन सिंह, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय व डॅरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाकडून मिसा भारती, उबाठा गटाचे अरविंद सावंत, बिजू जनता जलाचे सस्मित पात्रा, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व तेलुगू देसम पक्षाचे राम मोहन नायडू उपस्थित होते. (Bangladesh Protests)

(हेही वाचा –Bangladesh Protests : बांगलादेशात सरन्यायाधीशांचे घरही बनले आंदोलकांचे टार्गेट, मंदिरात तोडफोड)

“सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीत बांगलादेशमधील घडामोडींसंदर्भात माहिती देण्यात आली. सर्व पक्षांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांचे आभार”, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. सोबत त्यांनी बैठकीतील काही फोटोही शेअर केले आहेत. (Bangladesh Protests)

राहुल गांधींनी लोकसभेतील चर्चेदरम्यान बांगलादेशमधील घडामोडींसाठी परकीय शक्ती जबाबदार असल्याची काही माहिती आपल्याकडे आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावर जयशंकर यांनी “आमच्याकडे फक्त पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने बांगलादेशमधील आंदोलनाचं समर्थन करणारा डीपी ठेवला होता अशी माहिती आहे.” असं उत्तर दिलं. तसेच, “बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असण्याची शक्यता आहे” अशी माहितीही जयशंकर यांनी बैठकीत दिली. (Bangladesh Protests)

(हेही वाचा –Bangladesh Protests : पंतप्रधानपदासाठी भारतावर टीका करणारे Mohammad Yunus यांना आंदोलकांचा पाठिंबा)

दरम्यान, या बैठकीत राहुल गांधींनी सरकारला शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या पुढील नियोजनाबाबतही विचारणा केली. मात्र, त्यावर सविस्तर उत्तर देण्यास जयशंकर यांनी नकार दिला. “भारत सरकारनं यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातली माहिती आत्ताच उघड करता येणार नाही.” असं जयशंकर यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त भारक सरकार बांगलादेशच्या लष्कराशी संपर्कात असून भारतीय लष्करालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत दिली. “आपल्या देशाची सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.” असंही परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. “जर बांगलादेशमधील परिस्थिती आणखीन चिघळली, तर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी भारत सरकार सज्ज आहे.” असं एस. जयशंकर म्हणाले. (Bangladesh Protests)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.