पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे नियंत्रण
पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी बांगलादेशमधील ‘अन्सारूल्ला बांगला टीम’ (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केल्याचीही माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांना बांगलादेशातून पळवून लावण्यामागे पाकिस्तानच्या आय.एस.आय. या गुप्तचर यंत्रणेने महत्त्वाचा हात असल्याचेही समोर येत आहे. ‘एबीटी’सह जमात-ए-इस्लामी आणि इतर संघटना यांच्याशी आय.एस्.आय.चा थेट संपर्क होता, असे सांगण्यात येत आहे. भारतात कारवाया करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि एबीटी या संघटनांनी वर्ष २०२२ मध्ये एकत्र येऊन बांगलादेशामध्ये तळ स्थापन केला होता. वर्ष २०२२ मध्ये त्रिपुरामध्ये एका मशिदीची तोडफोड झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तेथील हिंदूबहुल भागांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच वर्षी त्रिपुरामध्ये एबीटी संघटनेचे ५० ते १०० दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, अशीही माहिती समोर आली होती. आसामध्येही कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या एबीटीच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती. (Bangladesh Violence)
(हेही वाचा Bangladesh Violence : हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पॅरिसमध्ये हजारो हिंदू उतरले रस्त्यावर)
बांगलादेशमधील कार्यरत दहशतवादी संघटना
Join Our WhatsApp Community