-
सायली डिंगरे-लुकतुके
बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात चर्चा आता देशभरच होत आहेत. अनेक राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ या समस्येविषयी जागृती करत आहेत. अनेक परिषदा, चर्चासत्रे या विषयावर होत आहेत. बांगलादेशी घुसखोरांनी भारताच्या विविध क्षेत्रांत केलेला शिरकाव पाहता त्यांना देशाबाहेर घालवणे नक्कीच आव्हानात्मक आहे. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Shubman Gill : शुभमन गिलसह गुजरात टायटन्सच्या ४ खेळाडूंना पोलिसांचं समन्स)
अनेक क्षेत्रांत, अनेक प्रांतात घुसखोरी
महाराष्ट्रापुरता विचार केला, तर बांधकामक्षेत्रात तर आता बांगलादेशी मजुरांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. राज्यात शासनाकडूनच अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहेत. यातील बहुतांश साईटवर बांगलादेशी मजूर काम करत आहेत. बांगलादेशी फेरीवाल्यांशिवाय तर आता खरेदीच होऊ शकत नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. सिग्नलवर वस्तू विकणारे, वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीमध्ये जिथे भरपूर वेळ देऊन किंवा कष्टाचे काम करावे लागते तिथे, मोठ्या शहरांत घरकामासाठी येणाऱ्या मदतनीस, दुर्गम भागांतील हॉटेलमध्ये सर्व प्रकारची कामे करणारे, विविध शहरांतील कचरावेचक हे सगळे बांगलादेशी धर्मांध असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरी भागासोबत कोकणातही आता बांगलादेशी, नेपाळी लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. कोकणात मासेमारी करणे, रेती काढणे, नारळ काढणे हेही आता बांगलादेशी करू लागले आहेत. थोडक्यात केवळ एका क्षेत्रात नाही, तर दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. (Bangladeshi infiltrators)
बांगलादेशी घुसखोरांचे प्रकार
भारतातील घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची चर्चा होते, तेव्हा बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध सुरु होतो. याविषयी ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन सांगतात की, भारतात आढळणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचे ४ प्रकार आढळतात. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Marathi Sahitya Sammelan : राजधानीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनातील प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव)
सीमावर्ती भागातील भारतीय हद्दीत बांगलादेशी घुसखोर प्रतिदिन येतात. ते त्या भागात भारतात रिक्षा चालवायला येतात. सकाळी येतात आणि दिवसभर धंदा करून संध्याकाळी परत जातात. मेघालय, त्रिपूरा, अगरताळा या भागातही हा प्रकार आढळतो. (Bangladeshi infiltrators)
भारतात रहाणाऱ्या ७० टक्के बांगलादेशी घुसखोरांकडे भारताचे आधारकार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे आहेत. भलेही ती बोगस पुरावे दाखवून किंवा भ्रष्टाचाराने मिळालेली असतील; परंतु त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत. त्यामुळे असे बांगलादेशी घुसखोर शोधून त्यांना बांगलादेशात परत पाठवणे, हे मोठे आव्हान ठरणार आहे. काही बांगलादेशींकडे भारतीय कागदपत्रे नाहीत, असे बांगलादेशी मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांना देशाबाहेर घालवणे शक्य होते. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Bandipora Army Accident : बांदीपोरामध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; तीन जवान हुतात्मा, दोन जखमी)
काही बांगलादेशींनी भारतात रहाण्यासाठी त्यांची नावे बदलली आहेत. त्यांच्या बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र असते, कुंकू पण लावतात. त्यामुळे त्यांनाही ओळखणे कठीण आहे. (Bangladeshi infiltrators)
बांगलादेशी घुसखोरांना स्थानिकांचीच मदत
आज भारतात ५-६ कोटी घुसखोर आहेत. भारतातील प्रशासकीय कामकाजातील प्रचंड घुसखोरीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे, तसेच अजूनही घुसखोरी सुरुच आहे. एका बांगलादेशी घुसखोर मुसलमानाला भारतीय व्यवस्थेत घुसवण्यासाठी ३०-३५ जण मदत करतात. यातील अनेकांना ते बांगलादेशी घुसखोराला मदत करत आहेत, याची जाणीवही असते. असे असले, तरी केवळ आर्थिक लोभासाठी असे देशविघातक कृत्य केले जाते. या बांगलादेशींना कोलकाता येथे २ दिवस भारतीय व्यवस्थेत घुसण्याचे ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर ज्या भागात त्यांच्या नोकरी-धंद्याची सोय केली आहे, तिथे पोहोचवले जाते. त्यामुळे केवळ बांगलादेशी घुसखोरांना हुसकवून चालणार नाही, तर त्यांना भारतात कोण मदत करत आहे, त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास बांगलादेशी घुसखोरांचे लोंढे रोखण्याच्या प्रक्रियेला गती येईल. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Meghna Kirtikar passed away: माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन)
कागदपत्रे मिळवलेल्यांचे काय ?
७० टक्के बांगलादेशी घुसखोरांकडे भारताचे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे आहेत. याचा अर्थ देशाच्या सुरक्षेचे मोल मोजून प्रशासकीय पातळीवर प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. ज्यांच्याकडे रहिवासी दाखला नसतो, त्यांना बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी स्थानिक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांचा दाखला हेच रहिवासी प्रमाणपत्र म्हणून दाखवण्याची मुभा असते. धर्मांधबहुल भागातील लोकप्रतिनिधींनी एकगठ्ठा मतांसाठी अशा हजारो लोकांसाठी दाखले दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशांना आपल्या प्रांतातील बांगलादेशी घुसखोरांची माहिती देण्याची इच्छा नसते. आधीच अधिकृत कागदपत्रे तयार झालेली असतात, त्यात स्थानिकांकडून काही माहिती मिळाली नाही, तर पोलीस दलही हतबल होते. (Bangladeshi infiltrators)
ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे, त्यांना त्यांच्या देशाबाहेर हुसकवणे कठीणच आहे. अशा वेळी शासनजमा असलेली वंशावळ सादर करण्याचे आदेश दिल्यास ते भारतीय नागरिकच आहेत की बांगलादेशी किंवा अन्य कोणत्या देशातील घुसखोर आहेत, हे सहजतेने ओळखता येईल. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Maharashtra Weather : थंडी परतली! राज्यात पुढील तीन दिवस ‘असे’ असेल हवामान)
बांगलादेशी घुसखोर धर्मांधांना हुसकवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करा!
अशा स्थितीत बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी पोलीस प्रशासनाला बळ देऊन देशभरात कोंबिंग ऑपरेशन हाती घेणे गरजेचे आहे. देशात निर्माण होणारे अनेक स्तरावरील रोजगार, पायाभूत सुविधा यांचा लाभ भारतीय नव्हे, तर हे बांगलादेशी घुसखोर धर्मांध घेत आहेत. ठिकठिकाणी झोपटपट्ट्या निर्माण करून शहरे बकाल करत आहेत. विशेष म्हणजे मुख्य प्रवाहातील माध्यमे या वाढत्या समस्येविषयी बोलायला तयार नाहीत. ठराविक नेते सोडता कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर बांगलादेशी घुसखोरांना हाकलणे हा मुद्दा नाही. त्यांना काबिज केलेल्या बाजारपेठा आणि उद्योग-धंदे भारतियांना मिळावेत, अशी कोणाची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे आता जनतेनेच आपल्या प्रांतात राहायला येणाऱ्यांकडे लक्ष ठेवून पोलिसांना त्यांची तात्काळ माहिती देणे आवश्यक आहे. जनतेने एकमुखाने मागणी केल्यास सरकारला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे लक्ष देणे भागच पडेल, हे निश्चित ! (Bangladeshi infiltrators)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community