-
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन
सध्या बांगलादेशमध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह अशी आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक केली जाणे या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथे असलेल्या हिंदूंचे रक्षण करणे, हे भारताचे नैतिक दायित्व आहे. या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Bandipora Army Accident : बांदीपोरामध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; तीन जवान हुतात्मा, दोन जखमी)
हिंसाचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’चा वाटा
बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेचा सर्वांत मोठा वाटा आहे. याखेरीज अनेक युवकही या हिंसाचारात सामील झाले. ज्यांचे मुख्य काम होते हिंदूंच्या घरातून सामान पळवायचे, त्यांच्या बायकांवर अत्याचार करायचे आणि या हिंसाचारामध्ये स्वतःचा लाभ करून घ्यायचा; मात्र ‘जमात-ए-इस्लामी’चा हिंदू विरोधातील हिंसाचार हा अत्यंत जुना आहे. याचा प्रारंभ होतो वर्ष १९७१ पासून. ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने ‘जमात-ए-इस्लामी’च्या साहाय्याने वर्ष १९७१ च्या युद्धापूर्वी ४० लाख तत्कालीन पूर्व पाकिस्तानी नागरिकांना मारले, ज्यामध्ये ३० लाख हे पूर्व पाकिस्तानमधील हिंदू होते आणि १० लाख लोक हे ‘अवामी लीग’ या पक्षाचे समर्थक होते. (Bangladeshi infiltrators)
वर्ष १९७१ नंतर अनेक वेळा बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या कारणाने हिंसाचार झाला आणि त्यामध्ये सर्वाधिक लक्ष्य केले गेले ते, म्हणजे तिथे असलेल्या हिंदूंना. त्यामुळे आपण ‘जमात-ए-इस्लामी’च्या इतिहासावर थोडी चर्चा करूया. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Meghna Kirtikar passed away: माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन)
जमात-ए-इस्लामीचा अशांततेत सहभाग बांगलादेशातील अशांततेत ‘जमात-ए-इस्लामी’ आणि तिची विद्यार्थी संघटना ‘छात्रशिबिर’ यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. विशेषतः वर्ष २०१३ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जेव्हा या संघटनेच्या नेत्यांच्या विरोधात युद्धाविषयीचे गुन्हे सिद्ध झाले, त्या वेळी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचारात ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे अनेक माध्यमांनी दाखवले आहे.
बांगलादेशातील हसीना यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या अनेक नेत्यांवर न्यायालयीन कारवाई केली. अनेक नेत्यांना युद्ध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०१३ मध्ये बांगलादेशातील न्यायालयाने ‘जमात-ए-इस्लामी’ला राजकीय पक्ष म्हणून बेकायदेशीर ठरवले, ज्यामुळे या संघटनेच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या. (Bangladeshi infiltrators)
जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव वर्ष १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर न्यून झाला आहे; परंतु काही काळासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वाला जपले होते. त्यानंतर न्यायालयीन निर्णय आणि तत्कालीन सरकारच्या कठोर धोरणांमुळे त्यांच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या. ‘जमात-ए-इस्लामी’चा जागतिक प्रभाव त्यांच्या धार्मिक विचारधारांमुळे असून त्यांच्या हिंसक कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारधारेवर टीका होत आहे. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Marathi Sahitya Sammelan : राजधानीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनातील प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव)
हिंदूंची संख्या शून्य टक्क्यावर येणार? आता येणाऱ्या काळामध्ये आणि बांगलादेशातील आगामी सरकारमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’चा राजकीय प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा असेल; कारण शेख हसीनांच्या विरोधात असलेली ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ पूर्णपणे ‘जमात-ए-इस्लामी’च्या प्रभावाखाली आहे. यामुळे असे मानले जाते की, येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंचे भवितव्य अतिशय कठीण होणार आहे. भारत सरकारने बांगलादेशमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे. अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून ० (शून्य) टक्क्यावर येईल. (Bangladeshi infiltrators)
बांगलादेशावर दडपण आणणे जरुरीचे
बांगलादेशात लोकशाही स्थिरावून सामाजिक आणि धार्मिक स्थिरता येणे, हे भारतासाठी हितावह आहे. भारताने साहाय्य करताना अखंड सावधान राहून अल्पसंख्यांकांचे संरक्षण होत आहे का? हे पहाणे आवश्यक आहे. ‘बांगलादेशात अल्पसंख्यांकांचा छळ झाला, तर त्याचे परिणाम आपल्या भारतासमवेतच्या संबंधांवर होतील आणि ते आपल्याला परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही हानीकारक आहे’, याची जाणीव बांगलादेशाला व्हायला हवी. ‘अल्पसंख्यांकांचे संरक्षण व्हावे’, यासाठी भारताने सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशावर दडपण आणणे जरुरीचे आहे. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- Shubman Gill : शुभमन गिलसह गुजरात टायटन्सच्या ४ खेळाडूंना पोलिसांचं समन्स)
दुसरे पाकिस्तान निर्माण होऊ नये, याची खबरदारी घ्या!
अल्पसंख्यांकांचा छळ मानवतेच्या दृष्टीने अन्यायकारक आहेच, तसेच तेथे छळ झाला, तर ते निर्वासित म्हणून भारतातच आश्रयास येतात आणि त्याचा भारताच्या आर्थिक, राजकीय अन् सामाजिक अशा विविध स्रोतांवर परिणाम होतो. ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष’, या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे. बांगलादेशाच्या भूमीत दुसरे पाकिस्तान निर्माण होऊ नये, याची खबरदारीही यापुढील काळात भारताला घ्यावी लागणार आहे. (Bangladeshi infiltrators)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community